VAMNICOM : वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेला ‘त्रिभुवन’ विद्यापीठाची मान्यता

Tribhuvan Cooperative Institute : वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (वॅम्नीकॉम) ही त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची (टीएसयू) मान्यता मिळविणारी देशातील पहिली संस्था झाली आहे.
Vamnicom
VamnicomAgrowon
Published on
Updated on

Pune News : वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (वॅम्नीकॉम) ही त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची (टीएसयू) मान्यता मिळविणारी देशातील पहिली संस्था झाली आहे. या संस्थेत सध्या चार दीर्घकालीन पदव्या आणि सहा अल्पकालीन कौशल्यवर्धित अभ्यासक्रम चालवले जातात.

हे अभ्यासक्रम आता संस्थेच्या वतीने त्रिभुवन विद्यापीठांतर्गत चालवले जातील. पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहकारातील वापरासंबंधीचे अभ्यासक्रम आता या संस्थेत शिकवले जातील.

यामुळे युवकांसाठी विशेषत: ग्रामीण भागातील युवकांसाठी करियरचे नवे दालन खुले होत आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Vamnicom
VAMNICOM: ‘व्हॅम्निकॉम’ला विद्यापीठाचा दर्जा नाकारल्याने आश्‍चर्य

वैकुंठभाई मेहता संस्थेच्या वतीने सध्या कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचा २ वर्षांचा पदव्युत्तर-पदविका, सहकार विषयातील २ वर्षांचा पदव्युत्तर-पदविका, सहकारी बँकिंग आणि वित्त विषयातील ४ वर्षांचा व्यवसाय प्रशासन डिग्री आणि सहकारी व्यवसाय व्यवस्थापनाचा ९ महिन्यांचा डिप्लोमा हे अभ्यासक्रम चालवले जातात. सहकाराच्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा सैद्धांतिक पाया भक्कम करणे आणि त्यांना व्यावहारिक अनुभव प्रदान करणे हे या अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट आहे.

Vamnicom
Vamnicom University: ‘व्हॅम्निकॉम’ला डावलणे अयोग्य

सहकारी क्षेत्रातील विशिष्ट कौशल्य कमतरता आणि नेतृत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वैकुंठभाई मेहता संस्था ६ अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवत आहे. यामध्ये कृषी-विपणन आणि सहकारी संस्थांमध्ये मूल्यवर्धन करणे, कृषी उत्पादक संघटनांचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञांसाठी दुग्ध तंत्रज्ञान या विषयातील २ महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कृषी उत्पादन आणि भावांचा अंदाज, युवा नेतृत्व आणि सामाजिक बदल आणि सहकारासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयांचा १ महिन्यांचा अभ्यासक्रम आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रासाठी कार्यरत असलेली वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था आहे. त्रिभुवन सहकार विद्यापीठाची या संस्थेला देशातील पहिली मान्यता मिळाल्याने आता या सहकार विषयक पूर्ण शैक्षणिक काम वॅम्नीकॉमला करता येईल. तसेच येथे शिकणाऱ्या सर्वांना अधिकृत विद्यापीठाची पदवी किंवा पदविका किंवा प्रमाणपत्र मिळेल. तसेच या संस्थेत आता सहकार विषयक संशोधनालाही चालना मिळेल. ग्रामीण भागातील युवकांसाठी करिअरचे नवे दालन खुले होईल. त्यामुळे देशातील सहकारापासून समृद्धीकडे नेण्यासाठी हे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com