Grape Management : मण्याचा आकार वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर

Grape Management : द्राक्ष उत्पादनामध्ये मण्याचा आकार हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आकार मिळविण्यासाठी संजीवकांचा वापर हा योग्य अवस्थेत व योग्य प्रमाणात होण्याची गरज असते. बागेचे व्यवस्थापन करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. स. द. रामटेके, आप्पासो गवळी

Grape Farming : मण्यांची देठाची जाडी

मणी मुख्य दांड्याला जोडून राहणे आणि मुख्य दांडा पाकळ्यांशी जोडून राहणे हे घड वेलीला चिटकून राहण्यासाठी विचारात घेणे आवश्यक आहे. मणी काढल्यानंतर साठवणीमध्ये किंवा वाहतुकीत त्यातील पाणी कमी झाल्यामुळे मणी सुकणे आणि मण्यांचा ताजेपणा कमी होण्याची समस्या उद्भवते.

मण्यातील पाणी १ ते २ टक्के कमी झाल्यानंतर ते सुकतात. जीए व सीपीपीयूचा वापर मण्यांचा आकार आणि देठांचा आकार वाढविण्यासाठी द्राक्षमणी ३-४ मि.मी. आणि ६-८ मि.मी. आकाराचे असताना करता येतो. त्यामुळे देठातील पेशींचे विभाजन आणि विस्तार होण्यास मदत होते. मण्यांच्या देठाच्या जाडीनुसार काढणीनंतरचे आयुष्य वाढत असल्याचे विविध प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

काय करावे?

बेरी पातळ करून घ्यावी आणि घडाला जीएच्या द्रावणात १/४ किंवा १/३ बुडवून घ्यावे. त्यामुळे प्रत्येक पानावर ८ बेरी राहतील.

जेव्हा घडाच्या विरुद्ध पानांची रुंदी १६ सेंमी असेल आणि बेरीची रुंदी कमी असल्यास (सुमारे १२ सेंमी) प्रति पानांची संख्या ६ पर्यंत कमी ठेवावी.

मणी लांब व गोलाकार करण्यासाठी ३-४ मि.मी. मणीच्या अवस्थेत जीए ३ (५० पीपीएम) + सीपीपीयू (२ पीपीएम) या प्रमाणात वापर करावा.

काय करू नये?

बेअरिंग शूटला १५ पेक्षा जास्त पाने ठेवू देऊ नये.

जेव्हा बेअरिंग शूटमध्ये पानांचे क्षेत्र अपुरे असते आणि कोंब कमी जोमदार असतात, तेव्हा घडावर सीपीपीयूची प्रक्रिया करू नये.

बेरीचा आकार बाजरी दाण्याइतका येण्यापूर्वी वेली बांधू नयेत.

बेरी पातळ करण्यासाठी उशीर करू नका. (वाटाणा अवस्थेपेक्षा जास्त आकार नसावा.)

Grape Farming
Grape Farming : द्राक्ष शेतीसाठी दीर्घकालीन धोरण हवे

मणी आकारवाढीसाठी जीए आणि सीपीपीयु यांचा वापर

मणी वाढीसाठी जीए आणि सीपीपीयू यांचा वापर अत्यावश्यक आहे. थॉमसन सिडलेस तसेच खाण्यासाठी वापरात येणाऱ्या रंगीत जाती (उदा. शरद सीडलेस, फ्लेम सीडलेस) मध्ये मण्यांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी

संजीवकांची मात्रा प्रमाणित केलेली आहे. फ्लेम सीडलेस व शरद सीडलेस या जातीसाठी मणी ३-४ मि.मी. व ६-७ मि.मी. आकाराचे असताना जीए ४० पीपीएम व सीपीपीयू ०.५ पीपीएम या प्रमाणात दिल्यास योग्य दर्जाची द्राक्ष मिळतात. थॉमसन सीडलेस या जातीसाठी देखील जीए आणि सीपीपीयूची मात्रा प्रमाणित केलेली आहे.

थॉमसन सीडलेस जातीमध्ये मण्यांच्या वाढीसाठी संजीवके वापराच्या अवस्था

मणी अवस्था जीए आणि इतर रसायने उद्देश

३-४ मि.मी. ४० पीपीएम जीए + सीपीपीयू २ पीपीएम (द्रावणाचा सामू ५-६) मण्यांचा आकार वाढविणे.

६-७ मि.मी. ४० पीपीएम जीए + १-२ पीपीएम सीपीपीयू (द्रावणाचा सामू ५-६ ) मण्यांचा आकार वाढविणे.

Grape Farming
Grape Crop Damage : राज्यात द्राक्षाचे सुमारे ९ हजार कोटींचे नुकसान

मण्याची लांबी वाढविणे

द्राक्ष बागेत मुख्यत्वे जिबरेलिक ॲसिडचा वापर केला जातो. यामुळे द्राक्ष मण्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम दिसून येतो. यामध्ये मुख्यत्वे घड तयार होणे, मणी वाढणे, घड लांबवणे, मणी आणि घड कमी करणे, मणी व घड विरळणी, मण्यांचे तडकणे टाळणे किंवा मणी सुकणे यासाठी जिबरेलिक अॅसिडचा वापर केला जातो.

द्राक्षाच्या मण्यांची लांबी जिबरेलिक ॲसिडचा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून मिळविता येते. मण्यांच्या वाढीच्या काळात केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मशागतीय पद्धतीचा त्यावेळी असलेल्या मणी वाढीवर परिणाम होतो. निर्यातीसाठी चांगल्या दर्जाची द्राक्षे तयार करण्यासाठी संजीवकांच्या वापराचे महत्त्व मोठे आहे.

मण्यांची लांबी मिळाल्यामुळे मण्यांच्या वाढीसाठी भरपूर मोकळी जागा मिळून सुटसुटीत घड तयार होतो. घड सुटसुटीत राहिल्यामुळे घडात हवा खेळती राहते, त्यामुळे रोग येण्याचे प्रमाण कमी केले होते. मण्यांची वाढ व पक्वता चांगली मिळते. फुलोरा अवस्थेमध्ये जर घडावर जिबरेलिक ॲसिडची फवारणी घेतली तर घडातील मणी विरळणी होण्यास मदत होते.

यामुळे मण्यांची वाढ होण्यासाठी अन्नद्रव्ये घेण्यासाठी होणारी स्पर्धा कमी करता येते. अशाप्रकारे जिबरेलिक ॲसिडचे वापरामुळे मण्यांची आवश्यक लांबी मिळविता येते. सुटसुटीत मोकळे घड, एकसारख्या आकाराचे मणी आणि एकसारखी पक्वता आणण्यास जिबरेलिक ॲसिडच्या वापराचे परिणाम शेवटी दिसून येतात. पांढऱ्या जातींच्या द्राक्ष मण्यांना लांबी मिळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संजीवकांची माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

द्राक्ष मण्यांची लांबी मिळविण्यासाठी वापरली जाणारी संजीवके

मणी वाढीची अवस्था जीए व इतर रसायने उद्देश

३-४ मि.मी. जीए- ३ (४० पीपीएम + सीपीपीयू (२ पीपीएम) (द्रावणाचा सामू ५-६) गोल मणी मिळविणे.

६-८ मि.मी. जीए- ३ (५० पीपीएम) + सीपीपीयू (१ पीपीएम) (द्रावणाचा सामू ५-६) मणी लांब, गोलाकार करणे.

टीप ः शरद सीडलेस आणि सोनाका या जातीसाठी जर मण्यांची लांबी हवी असेल तर वरील तक्त्याप्रमाणे संजीवकांचा वापर करावा.

- डॉ. एस. डी. रामटेके, ९४२२३१३१६६

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com