Uzi Fly Management : उझी माशी व्यवस्थापनासाठी ‘एनटी पाऊच’चा वापर पर्यावरणपूरक

NT Pouch Usage : रेशीम कीटकांवरील उझी माशीच्या व्यवस्थापनासाठी निझोलायनेक्स थायमस (एनटी) पाऊचचा वापर पर्यावरणपूरक आहे. निझोलायनेक्स थायमस या मित्र कीटकांचे रेशीम संशोधन योजनेअंतर्गत उत्पादन सुरू आहे.
Uzi Fly Management
Uzi Fly ManagementAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : रेशीम कीटकांवरील उझी माशीच्या व्यवस्थापनासाठी निझोलायनेक्स थायमस (एनटी) पाऊचचा वापर पर्यावरणपूरक आहे. निझोलायनेक्स थायमस या मित्र कीटकांचे रेशीम संशोधन योजनेअंतर्गत उत्पादन सुरू आहे. रेशीम कोष उत्पादकांनी या मित्र कीटक पाऊचचा वापर करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी केले आहे.

उझी माशी ही रेशीम कीटकावरील अतिशय नुकसानकारक कीड असून, १५ ते २० टक्क्यांपर्यंत नुकसान करते. नुकसान पातळी वाढल्यास ४० ते ५० टक्के नुकसान होऊ शकते. निझोलायनेक्स थायमस हे कोष परोपजीवी कीटक आहेत. ते आकाराने १ ते २ मिलिमीटर लांब असतात. उझी माशीचे कोष शोधून त्यात अंडी घालतात. या कीटकांची रेशीम कीटकाला व पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. १०० अंडीपुंजाच्या बॅचसाठी २ एनटी पाऊच वापरावे.

Uzi Fly Management
Black Fly : काळ्या माशीचे व्यवस्थापन

रेशीम कीटकांनी चौथी कात टाकल्यानंतर तिसऱ्या दिवशी पाऊच रॅकला मध्यभागी टांगून ठेवावे. रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर हे एनटी पाऊच चंद्रिकेजवळ ठेवावे तसेच कोष काढणीनंतर शेणखताच्या खड्ड्याजवळ ठेवावेत. संगोपनगृहात उझी माशीचे प्युपा (कोष) रेशीम कीटकाच्या ५ व्या अवस्थेत त्यानंतर चंद्रिकेवर परिपक्व कोष विणन करताना व कोष काढणीनंतर उरलेली विष्ठा खताच्या खड्ड्यात टाकल्यानंतर दिसतात.

Uzi Fly Management
Fruit Fly Control : फळमाशी नियंत्रणासाठी ‘रक्षक सापळा’

निसोलिनक्स थायमस हे मित्र कीटक या पाऊचमधून निघण्यास सुरुवात झाल्यास १५ दिवसांपर्यंत निघतात. एका पाऊचमध्ये ५० मिलिमीटर घर माशीच्या कोषाचे एनटीच्या साह्याने परोपजीविकरण केलेले असून, त्यामधून ७ ते ८ हजार मित्र कीटक निघतात. निझोलायनेक्स थायमसला त्यांची पुढची पिढी वाचविण्यासाठी उझी माशीचे कोष (प्युपा) लागतात.

कोषात अंडी घातल्यानंतर एनटी मॅगट कोषातील जीवघटक नष्ट करतात. त्या कोषातून उझी माशी निघत नाही. निझोलायनेक्स थायमस (एनटी) पाऊचचे उत्पादन सुरू असून, १५ दिवस अगोदर मागणी केल्यास कुरियरच्या साह्याने पाठवता येतील. सर्व रेशीम उद्योजकांनी या मित्र कीटकांचे पाऊच वापरावे, असे आवाहन रेशीम संशोधन योजनेचे डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. संजोग बोकन, धनंजय मोहोड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा : डॉ. संजोग बोकन मोबा. ९९२१७५२०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com