
Modern Agriculture Equipments: शेतीत उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा स्वीकार करणे महत्त्वाचे ठरत आहे. पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती यांची तुलना करायची झाल्यास तंत्रज्ञानामधील बदल व नवीन यंत्रसामग्री यांचा मोठा वाटा आहे. कृषी प्रदर्शनांमध्ये सुद्धा आता विविध प्रकारची छोटी मोठी यंत्रसामग्री दिसू लागली आहेत.
शारीरिक कष्ट करणारे मजूर कमी झाल्यामुळे आणि सर्वांनाच सावलीत बसून काम करायची सवय लागल्यामुळे यांत्रिकीकरण अपरिहार्य ठरत आहे. मजुरीचे दर वाढत गेल्यामुळे अनेक ठिकाणी शेती आता परवडणारी राहिलेली नाही. याचा परिणाम म्हणून गेल्या काही दशकभरात भारतीय शेतकऱ्यांकडील यंत्रसामग्रीमध्ये मोठा बदल घडून आला आहे.
आधुनिक यंत्रे-अवजारे
पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी आता आधुनिक यंत्रसामग्रीकडे वळत आहे. पूर्वीच्या काळी शेतकरी बैलजोडी, नांगर, खुरपी, कुऱ्हाड, वखर, मोट, कुळव अशा पारंपरिक साधनांनी शेती व्यवसाय करत असे. ही साधने कामासाठी अधिक वेळखाऊ आणि शारीरिक कष्टाची होती. परंतु काळाच्या ओघात आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतीमध्ये अनेक आधुनिक साधनांची भर पडली. ट्रॅक्टरच्या मदतीने जमिनीची खोल नांगरणी, वखरणी, सरी-वरंबे तयार करणे अशा अनेक कामांत वेळ आणि श्रम वाचतात.
ट्रॅक्टरला जोडलेला स्प्रे पंप, हॅरो, रोटाव्हेटर, ट्रॉली, हार्वेस्टर, कल्टिव्हेटर, लेव्हलर हे आता शेतीमध्ये सर्रास पाहायला मिळतात. पूर्वी शेतकऱ्यांकडे विहिरीतील पाण्याचा उपसा बैल जुंपलेल्या मोटेतून, डिझेल इंजिन, केरोसीन इंजिन किंवा हातपंपाने केला जात असे. आता इलेक्ट्रिक पंप, सौर पंप, ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर, रेन गन यांसारख्या आधुनिक पद्धती आल्या आहेत.
पूर्वी पेरणी हाताने किंवा पारंपरिक बी पेरणी साधनांनी केली जात असे. आता ऑटोमॅटिक सीड ड्रील्स, रोपणी यंत्रे आली आहेत. कापणीसाठी हँड कटर, थ्रेशर, रीपर, हार्वेस्टर यंत्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. बियाणे पेरणी यंत्र, रोपणी यंत्र, धान्य मळणी यंत्र, कापणी यंत्र, हार्वेस्टर, चारा पॅकिंग मशिन, फवारणी यंत्र, पावर स्प्रेअर, हात पंप स्प्रेअर, बूम स्प्रेअर, ड्रोन फवारणी यंत्र, शेंगा फोडण्याचे साधन, चाफ कटर, पडी, वखर, जातं, हँड स्प्रेअर, झाडकुंची (कीटकनाशक लावण्याचे), शेताच्या कुंपणासाठी नेटिंग मशिन, पॉवर विडर, हात निंदणी, व्हरायटी टेस्टिंग किट, मळणी मशिन, सोलर ड्रायर, पॉवर टिलर ही अशी सर्व नावे आता शेतकऱ्यांच्या ओळखीची होऊ लागली आहेत.
मल्चिंग मशिन, पॉलिहाउस संरचना, शेडनेट, नर्सरी ट्रे, सॉइल टेस्टिंग किट, मृदा आर्द्रता मीटर, पीएच मीटर, नायट्रोजन टेस्टर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, कोल्ड स्टोरेज यंत्रणा, बीज उपचार यंत्र, डस्टर मशिन, बीज प्रक्रिया यंत्र, सेंद्रिय खत उत्पादन यंत्र, कंपोस्टर मशिन, बायोगॅस युनिट, अॅग्री ड्रोन, स्मार्ट सेन्सर, फार्म मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, मोबाइल अॅप, व्हिडिओ कॅमेरे, सोलर लाइट्स, इलेक्ट्रिक कुंपण, गोदाम वाळवणी यंत्रणा, शेंगा सोलणी यंत्र, भूजल पातळी मापक, बीन्स शेलर, कॉर्न शेलर, आलू खोदणी यंत्र, कांदा कापणी यंत्र, ऊस तोडणी यंत्र, गहू कापणी यंत्र, बाजरी कापणी यंत्र, धान्य काढणी यंत्र, झेंडू फुल तोडणी यंत्र, बीज रोपवाटिका उपकरणे, बियाणे साफ करणारे यंत्र वापरणारी शेतकऱ्यांची पहिली पिढी असेल.
टरबाइन पंप, हॉर्टिकल्चर किट, मल्चिंग पेपर लावणारे यंत्र, ऑटोमॅटिक ग्रीनहाऊस कंट्रोल, हायड्रोपोनिक सेटअप, अॅक्वापोनिक यंत्रणा, कीटक सापळे, फळ सॉर्टिंग मशिन, ग्रेडिंग मशिन, फळ पॅकिंग मशिन, हरितगृह थर्मामीटर, हवामान निरीक्षण यंत्र, ट्रॅक्टर ट्रॉली, सीड ट्रे फिलर, प्लॅस्टिक क्रेट्स, खत मिक्सर मशिन, ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर, डिझेल जनरेटर, सौर वीज यंत्रणा, पॉवर हारो, स्टीयरिंग कल्टिव्हेटर, स्मार्ट फार्मिंग डिव्हाइसेस या सर्वांमुळे शारीरिक काम संपुष्टात येत असून यंत्रांचा वापर प्रचंड वाढला आहे.
अलीकडच्या काळात ड्रोनचा वापर शेतीमध्ये होऊ लागला आहे. ड्रोनच्या मदतीने कीडनाशकांची फवारणी, पिकांचे निरीक्षण, जमिनीचे मोजमाप, पीक सर्व्हेक्षण अशा गोष्टी केल्या जात आहेत. शेतीतील यंत्रसामग्रीत झालेले हे बदल अचानक घडलेले नाहीत. जागतिक तंत्रज्ञान भारतात पोहोचल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय खुले झाले. आधी जी कामे ५-७ दिवसांत होत, ती ट्रॅक्टर, हार्वेस्टरने एका दिवसात होतात. शेतीत बदलती यंत्रसामग्री ही फक्त सुरुवात आहे.
भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सेन्सर तंत्रज्ञान, स्मार्ट फॉर्मिंग, रोबोटिक्स, कृषी डेटा अॅनालिटिक्स यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल. पिकांचे रोग ओळखण्यासाठी सेन्सर आणि अॅप्स वापरले जातील. शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे हवामान माहिती, बाजारभाव मिळेल. शासनानेही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी यंत्र भाडे सेवा केंद्रे सुरू केली आहेत. गावोगावी कृषी केंद्रे, ग्राहक सहकारी सोसायट्या आधुनिक साधनांची भाड्याने सुविधा देऊ लागल्या आहेत. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. यंत्रसामग्री फक्त सुविधा नाही, तर भविष्याचा मार्ग आहे.
shekharsatbara@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.