Beekeeping Workshop : मधमाशी पालनावर राष्ट्रीय कार्यशाळा

Beekeeping Business in Nashik : ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा. लि. संचलित पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक येथील बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दर वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
Beekeeping
Beekeeping Agrowon
Published on
Updated on

Nashik News : ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा. लि. संचलित पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक येथील बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दर वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी २१ ते ३० डिसेंबर २०२३ दरम्यान ‘हनी बी फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असून, यादरम्यान अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२७ आणि २८ रोजी मधमाशी पालनातून शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणे, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मधमाशी पालन विषयावर देशपातळीवरील काम करणाऱ्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम’चे कार्यकारी संचालक श्री. संजय पवार यांनी दिली.

Beekeeping
Beekeeping : उत्पादनवाढीकरिता मधमाशीपालन आवश्यक

या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये मधमाशी पालनावर काम करणारे अनेक नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्या सत्रामध्ये शेतीचे उत्पादन वाढविणे, त्या अनुषंगाने विविध जातींच्या मधमाशांचा उपयोगाबद्दल डॉ. गोपाल पालिवाल (वर्धा), प्रा. उत्तम सहाणे (कोसबाड हिल, पालघर), डॉ. ऋषिकेश औताडे (नगर) हे मार्गदर्शन करणार आहेत.

दुसऱ्या सत्रामध्ये आधुनिक पद्धतीने मधमाशी पालन या विषयावर डॉ. प्रदीप चुनेजा (लुधियाणा), मधमाशीपासून विविध पदार्थ निर्मिती- डॉ. लक्ष्मी राव (पुणे), बी- ब्रीडिंग- श्री. संजीव तोमर(यू. पी ), राणीमाशी निर्मिती- डॉ. हेमंत डुबेरे (पुणे) हे मार्गदर्शन करणार आहेत.

तिसऱ्या सत्रामध्ये मधमाशीपासून मिळणारे विविध पदार्थ आणि विक्री व्यवस्था या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सत्रात मधमाशीजन्य विविध पदार्थांची गुणवत्ता तपासणी- डॉ. धनंजय वाखले (पुणे), मधमाशीपासून मिळणाऱ्या विविध पदार्थांना निर्यातीत असणारा वाव- श्री. जयदेव सिंग (बागपत, उत्तर प्रदेश), मध निर्यातीतील सद्य:स्थिती आणि वाव - डॉ. गोविंद हांडे (पुणे) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

चौथ्या सत्रामध्ये ‘मधमाशी पालनाची सद्य:स्थिती’ या विषयावर डॉ. तुकाराम निकम (नाशिक), अ‍ॅपी टुरिझम- श्री. संजय पवार (नाशिक), मधमाशी संवर्धनासाठी शासनाच्या विविध योजना श्री. विश्‍वास बर्वे (नाशिक) हे मार्गदर्शन करणार आहेत.

पाचव्या सत्रामध्ये देशात- विशेषत: महाराष्ट्रामध्ये मधमाशी पालनाला चालना देण्यासाठी योग्य पद्धतीने कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी आणि नियोजन यावर भर देण्यात येणार आहे.

Beekeeping
Beekeeping : उच्चप्रतीच्या मधमाशीमुळे शाश्‍वत मधमाशीपालन शक्य

महाराष्ट्रामधील सर्व विभागातील यशस्वी मध उद्योजक या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सर्व तज्ज्ञांसोबत चर्चा करून मधमाशी पालनातून शेतीची उत्पादन वाढ आणि रोजगार निर्मिती कशा प्रकारे होऊ शकते याचा कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करणे तसेच शासनाला याबद्दल सूचना करणे या विषयीही चर्चा होणार आहे. समारोपाच्या सत्रामध्ये प्रत्यक्ष कृतीतून मधमाशी पालन, प्रक्रिया व्यवस्थापन आणि गुणवत्ता तपासणी हा कार्यक्रम असणार आहे.

मधमाशी पालनावरील या राष्ट्रीय कार्यशाळेत कृषी आणि संलग्न विभागातील अधिकारी, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, मधमाशी पालनामध्ये काम करणाऱ्‍या संस्था, सेवाभावी संस्था, मध उद्योजक, युवक, शेतकरी आणि महिला सहभागी होणार असल्याची माहिती या कार्यशाळेचे समन्वयक आणि ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेमचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. भास्कर गायकवाड यांनी दिली.

सहभागी होण्यासाठी संपर्क साधा

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ७७७४०८९५१७, ९६९९७८१६३९, ७५०७७५७७०० या मोबाइल क्रमांकांवर संपर्क करावा किंवा www.baswant. com या वेबसाइटवर भेट द्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com