US-India Trade: कृषी आयातीवरून भारतावर अमेरिकेचे दबावाचे डावपेच

Global Trade War: अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर आयात शुल्काबाबत दबाव वाढवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जशास तसे’ कर लागू करण्याचा निर्णय घेतला असून, भारताच्या कृषी उत्पादनांवरील १००% शुल्कावर टीका केली आहे.
US-India
US-India Agrowon
Published on
Updated on

New York News: ‘अमेरिकेतील कृषी उत्पादनांवर भारताकडून १०० टक्के कर लागू केला जातो. इतरही अनेक देश मोठे शुल्क आकारत आहेत. त्यामुळे आमची उत्पादने या देशांना निर्यात करणे जवळपास अशक्य होऊन बसते,’ अशी टीका अमेरिकेने केली आहे. हे देश अनेक वर्षांपासून अमेरिकेला लुटत आहेत, असे ‘व्हाइट हाउस’चे माध्यम सचिव कॅरोलिन लिव्हीट यांनी म्हटले आहे.

भारत आणि इतर काही देशांकडून अधिक कर आकारणी होत असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केली आहे. त्यांनी बुधवारपासून (ता. २) ‘जशास तसे’ कर लागू करण्याचा निर्णय जाहीर केला असून, हा अमेरिकेसाठी ‘मुक्ती दिन’ असेल, असे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर कॅरोलिन लिव्हीट यांनी इतर देशांकडून आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्काबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

US-India
America Canada Trade War: ट्रम्प यांची खेळी अमेरिकेच्याच शेतकरी, ग्राहकांच्या अंगलट; आयाशुल्क वाढीमुळे भाव वाढले, निर्यातीवरही परिणाम

‘‘आमच्यावर अन्यायकारक कर आकारणी होत आहे. अमेरिकेच्या दुग्धजन्य पदार्थांवर युरोपीय महासंघाकडून ५० टक्के, तांदळावर जपानकडून ७०० टक्के, कृषी उत्पादनांवर भारताकडून १०० टक्के आणि अमेरिकी बटरवर कॅनडाकडून ३०० टक्के कर आकारणी केली जाते. त्यामुळे आमची उत्पादने या देशांमध्ये निर्यात करणे अशक्य झाले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक अमेरिकी नागरिकांना या बाजारपेठेतील रोजगारापासून मुकावे लागले आहे. त्यामुळे आता या देशांना जशास तसे उत्तर देणे भाग आहे. ट्रम्प यांनी ऐतिहासिक बदलाच्या दिशेने पाऊल टाकले आहे,’’ असे लिव्हीट म्हणाल्या.

US-India
Soybean Tariff War: चीन-अमेरिका सोयाबीन बाजाराचा खेळ बिघडवणार का?

ट्रम्प यांनी मागील काही दिवसांमध्ये विविध देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लागू केले आहे. मात्र हे आयात शुल्क तात्पुरते असून स्थायी स्वरूपाचे शुल्क दोन एप्रिलपासून लागू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

भारताकडून आयात शुल्कात घट?

अमेरिकी वस्तूंवरील आयात शुल्कात भारताकडून मोठी घट केली जाणार असल्याचे मला सांगण्यात आल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भारताने हे आधीच का नाही केले, असा सवालही त्यांनी विचारला. अमेरिकेच्या नव्या करांमुळे अनेक देश चीनच्या बाजूने झुकतील, अशी शंका पत्रकारांनी व्यक्त केली. त्यावर, ‘उलट यामुळे या देशांमधील उत्पादन सुधारण्यास मदत होईल,’ असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या धोरणामुळे युरोपनेही मोटारींवरील शुल्क २.५ टक्क्यांनी कमी केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com