Fertilizers Supply : राज्यात बनावट संयुक्त खतांचा पुरवठा

Supply of Fake Fertilizers : केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त ग्रेड्‌सशी साम्य असलेल्या बनावट खतांचा पुरवठा राज्यात होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.
Fertilizer supply
Fertilizer supply Agrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त ग्रेड्‌सशी साम्य असलेल्या बनावट खतांचा पुरवठा राज्यात होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. विशेष म्हणजे या खतांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या तसेच त्यांचे वितरक व विक्रेते यांची नोंदणी केंद्रीय रासायनिक खते मंत्रालयाच्या प्रणालीवर झालेली नाही.

संयुक्त ग्रेड्‌सची खते विकण्यासाठी सर्वप्रथम केंद्राच्या एकात्मिक खते व्यवस्थापन प्रणालीत (आययएफएमएस) नोंदणी करावी लागते. नोंदणी नसल्यास कंपन्यांना अनुदान दिले जात नाही. या प्रणालीत नोंद केलेली नसतानाही काही कंपन्या अनुदानित दरामध्ये खत विक्री करीत असल्याचे कृषी आयुक्तालयाच्या निदर्शनास आले आहे. अनुदान मिळत नसतानाही स्वस्तात खत विक्री होत असल्यामुळे अशा खतांची निर्मिती आणि विक्री संशयास्पद असल्याचे आयुक्तालयाला वाटते.

Fertilizer supply
Fertilizers Sale : बफर साठ्यापैकी ७० टक्के खत विक्रीसाठी खुला

अनुदानित दरात खत विक्री करणाऱ्या या कंपन्यांबाबत आता सावध भूमिका घेण्याचे कृषी विभागाने ठरवले आहे. त्याच एक भाग म्हणून सर्व भरारी पथकांना तसेच राज्य शासनाच्या व जिल्हा परिषदांकडील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तपासणीअंती अशा कंपन्यांच्या खतांना तत्काळ विक्री बंद आदेश द्यावेत, या कंपन्यांच्या खताच्या उगम प्रमाणपत्राची चौकशी करावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

Fertilizer supply
Fertilizers Stock : नगरमध्ये खताच्या शिल्लक साठ्यावरच खरिपाची मदार

केंद्राच्या ‘आयएएफएमएस’ प्रणालीवर नोंदणी असलेल्या परराज्यांतील कंपन्या, तसेच राज्यातील ‘क’ व ‘ड’ ग्रेड्‌सच्या कंपन्यांवर देखील यापुढे लक्ष ठेवा, असे आदेश गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना देण्यात आले आहे. अशा कंपन्यांचे नमुने मोठ्या प्रमाणात काढावेत व कंपन्यांनी नमूद केल्यानुसार खतामध्ये दर्जा आहे की नाही हे तपासावे, असे निरीक्षकांना सांगण्यात आले आहे.

भारतीय जन उर्वरक परियोजनेत समाविष्ट असलेल्या खतांसारखे उत्पादन असल्याचे भासवून खत विक्री होत असल्यास नेमका कोणता गुन्हा ठरू शकतो, याचेही स्पष्टीकरण कृषी आयुक्तालयाने दिले आहे. अशा प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबाबत तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ व खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदींचा भंग केल्याबद्दल संबंधित कंपनीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करता येईल, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, हा प्रकार एखाद्या विभागात चालू असल्यास त्याची जबाबदारी संबंधित गुणनियंत्रण तंत्र अधिकारी व मोहीम अधिकाऱ्यावर निश्‍चित केली जाईल, असेही आयुक्तालयाने एका पत्रात नमूद केले आहे.

बनावट खतपुरवठा गुजरातमधून

गुजरातमधील काही कंपन्या बनावट खत पुरवठ्यात गुंतल्या आहेत. औद्योगिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांपासून मोठ्या प्रमाणात टाकाऊ कचरा निघतो. काही कंपन्या हा कचरा वापरून रासायनिक गोळ्या बनवतात आणि याच गोळ्यांना रासायनिक खत म्हणून विकतात, अशी धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. या कंपन्यांना आता थेट फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com