Urdhva Wardha Irrigation : ...तर कार्यालयाला ठोकणार कुलूप

Irrigation Project Affected Farmer : विदर्भ सिंचन विकास मंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
Vidarbha Irrigation Development Board Office
Vidarbha Irrigation Development Board OfficeAgrowon

Amravati News : हंगामात ऊर्ध्व वर्धा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्यात फुगवटा निर्माण होतो हे पाणी नंतर काठावरील शेतशिवारात शिरत ३६ शेतकऱ्यांचे २०० एकर क्षेत्र बाधित होते.

त्यापोटी वारंवार भरपाईची मागणी करुनही धरणातील पाण्यामुळे नाही तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याचे दर्शवीत भरपाईस टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याविरोधात आता विदर्भ सिंचन विकास मंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

Vidarbha Irrigation Development Board Office
Agriculture Irrigation : देगाव कालव्यासाठी ३०० कोटींची तरतूद करणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमित अढाऊ यांच्यासह सिंभोरा सरपंच प्रफुल्ल उमरकर यांनी या संदर्भाने निवेदन दिले. अमरावती येथील जलसंपदा विभागाचे अभियंता तसेच ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले, की ऊर्ध्व वर्धा सिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी पावसाळ्याच्या दिवसात वाढीस लागते.

अशावेळी अतिरिक्‍त पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्याकरिता प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडण्यात येतात. मात्र या पाण्यामुळे नदीपात्रात फुगवटा निर्माण होत हे पाणी लगतच्या शेतशिवारात शिरते. परिणामी, नदीकाठावरील शेतकऱ्यांना दरवर्षी नुकसान सोसावे लागते. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने शेतकरी करतात.

Vidarbha Irrigation Development Board Office
Agriculture Irrigation : सिंचनासाठी पाणी न दिल्याने शेतकऱ्यांचे उपोषण

परंतु धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे हे नुकसान झाल्याची बाब जलसंपदा विभागाने सातत्याने नाकारली. नैसर्गिक आपत्तीमुळेच हे नुकसान होत असल्याचा दावा यासाठी त्यांच्याद्वारे केला जातो. त्यामुळेच २०२३ मध्ये पाटबंधारे खात्याच्या मागणीनुसार कृषी विभागाने ५७ लाख रुपयांचा मूल्यांकन अहवाल तयार केला.

त्यापूर्वी २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठित केली होती. या समितीने नुकसानीच्या नेमक्‍या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातही धरणातील पाण्याचा विसर्ग आणि त्यामुळे वाढणारी नदीच्या पाण्याची पातळी व हे पाणी शेतात शिरत असल्याने नुकसान होत असल्याचा अहवाल दिला होता.

मात्र तो अहवाल नाकारत नैसर्गिक आपत्तीच्या परिणामीच नुकसान होत असल्याचा दावा जलसंपदा विभाकडून केला जात भरपाईस नकार दिला जात आहे. त्यामुळे या विरोधात आता नागपुरातील विदर्भ सिंचन विकास मंडळाच्या कार्यालयालाच कुलूप ठोकून आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमित अढाऊ यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com