Sugarcane Cultivation : राज्यात ऊस लागवडीत २५ टक्क्‍यांपर्यंतची घट

Sugarcane Production : यंदा जाणवणारी पाणीटंचाई उसाच्या नव्या लागवडी रोखण्याला कारणीभूत ठरत आहे. उसाचा हंगाम लांबण्याची शक्यता असताना आता पुढील हंगामात उलट स्‍थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon

Kolhapur News : यंदा जाणवणारी पाणीटंचाई उसाच्या नव्या लागवडी रोखण्याला कारणीभूत ठरत आहे. उसाचा हंगाम लांबण्याची शक्यता असताना आता पुढील हंगामात उलट स्‍थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सुरुवातीपासून उसाच्या लागवडी धीम्या राहिल्‍या आहेत. आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरीही लागवडी मात्र वेगाने होत नसल्याचे चित्र आहे.

पाण्याअभावी लागवडी घटल्यास पुढील वर्षी उसाची चणचण भासण्‍याची शक्यता आहे. पुढील वर्षात लागवडी कशा राहतील याबाबतची माहिती केंद्राकडून संकलित करण्यात येत आहे. साखर आयुक्‍तालयाच्या सूत्रांनी पाण्याअभावी लागवडी खोळंबतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

आयुक्तालयाच्या वतीने कारखान्‍यांशी संपर्क साधून पुढील हंगामाबाबत माहिती घेण्‍यात येत आहे. कारखान्यांच्या प्रतिनिधींनीही पुढील काही महिन्यांत पाणी कमी पडण्याची शक्यता असल्याने ऊस लागवडी कमी प्रमाणात होत असल्याचे सांगितले.

Sugarcane Cultivation
Sugarcane : ऊस उत्पादनाचे अंदाज का फसले?

राज्‍यात जूनपासून पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले. अनेक धरणांमध्येही मोजकाच पाणीसाठा आहे. यंदा उन्हाचा तडाखाही मोठा आहे. अनेक ठिकाणी एप्रिल व मे महिन्यात उपसाबंदीची शक्यता आहे. विहिरी व कूपनलिकांचे पाण्याच्या पाणीपातळीतही घट असल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत तरी पाणी पुरेल की नाही याबाबत उत्पादकांत साशंकता आहे.

या भीतीपोटी अनेक शेतकऱ्‍यांनी लागवडीचा बेत पुढे ढकलला आहे. यामुळे राज्यांतील ऊस पट्ट्यात सध्या तरी शांतताच दिसत आहे. सध्या नव्‍या लागवडीपेक्षा शेतातील ऊस कसा घालवायचा हिच चिंता उत्‍पादकांना भेडसावत असल्याचे चित्र आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Season : जळीत उसाला प्रतिटन ५० रुपये कपात होणार

रोपवाटिकांमधूनही मागणी घटली

एप्रिल, मे मध्‍ये पाणी कमी पडणार हे गृहीत धरुन शेतकऱ्यांनी ऊस लागवड थांबविली. यामुळे सध्‍या रोपांची मागणी थंडावली आहे. अनेक रोपवाटिका चालक आहे ती रोपे विक्री करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी अन्य राज्यांचाही पर्याय शोधत आहेत. जोपर्यंत जून, जुलैमध्ये पुरेसा पाऊस होणार नाही तोपर्यंत अपेक्षित लागवडी होण्याची शक्यता कमी असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले.

आडसाली लागवडी घटणार?

यंदा ज्या शेतकऱ्यांच्या आडसाली लागवडी आहेत. त्यांना वेळेत ऊस तोडणीसाठी खूप मनस्ताप सहन करावा लागला. उसाची वाढ पूर्ण झाल्‍यानंतर वेळेत तोडणी न झाल्याने ऊस पडला. आडवा झालेला ऊस यंत्राने तोडणे अशक्य होते. मजूर कमी असल्‍याने पुन्हा तोडणीचा कालावधी वाढतच गेला.

यामुळे अक्षरशः ऊस पेटवून तो कारखान्याला न्यावा लागला. यंदा आडसालीचे मोठे नुकसान झाल्‍याने पुढील वर्षी एकसाली ऊस लागवडीलाच राज्‍यात प्राधान्‍य मिळेल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com