Team Agrowon
यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादनात घट येईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत होते. केंद्र सरकारनं तर लोकसभा निवडणुका आणि उत्पादन घटीचे अंदाज पाहून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध लादले.
अनेकांचा अंदाज तर असाही होता की, मार्चच्या शेवटी गाळप हंगाम संपेल. पण अजूनही राज्यात ५० लाख टन उसाचं गाळप बाकी आहे.
आणि या अतिरिक्त ऊसासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तालयानं दिल्यात. हंगामाच्या सुरुवातीला ९२४ लाख टन ऊस उपलब्ध हौईल असा अंदाज होता.
पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उसाचं पोषण चांगलं झालं आणि उत्पादकताही वाढली.
त्यात मजूर टंचाईन ऊस नेमका किती तोंडाला जाईल, याचाही अंदाज आला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. पण यंदा एफआरपीच्या मागणीसाठी आंदोलनं झाली.
त्यामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले. त्यामुळे ऊस उत्पादनाचे अंदाज फसले. त्यामुळे आता ऊस उभा राहतो की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागलीय.