
Palghar News : निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व अवकाळी, तसेच वातावरणातील बदलाच्या परिणामाचा यंदा पुन्हा एकदा आंबा, काजू उत्पादनाबरोबरच काळाभोर रानमेवा असलेल्या जांभूळ पिकावरही झाला आहे.
बाजारात अद्याप जांभूळ विक्रीसाठी न आल्याने बागायतदार, विक्रेत्या महिलांचे हाल झाले आहेत. पावसाळ्यात जांभूळ पिकण्याची शक्यता असल्याने आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
यावर्षी उशिराने जांभूळ पिकले असून, विक्री हंगाम उशिराने सुरू झाला आहे. मे आला तरी गावरान जांभूळ अद्यापही पाहिजे, त्या प्रमाणात पिकली नसल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
यामुळे विक्रमगड परिसरातील नागरिक जांभळाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यातच गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस, तसेच वादळी वाऱ्यामुळे जांभूळ पिकावर मोठा परिणाम झाला आहे, तर तयार झालेली जांभळे गळून गेली आहेत. त्यामुळे अपेक्षित प्रमाणात जांभूळ बाजारात दाखल झाली नाहीत.
गावरान जांभळे बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडते, मात्र जांभळाचे उत्पादन कमी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चालेला आहे. त्यात पावसामुळे जांभूळ पिकण्याचा कालावधी लांबत जात जून उजाडतो आणि फळे खराब होत बागायतदारांना नुकसान सहन करावे लागते. गेल्या दोन-चार वर्षांपासून पाहिजे, तसे उत्पन्न निघत नसल्याने शेतीप्रमाणे सर्वच आलबेल झाले आहे.
गावरान जांभूळ दुर्मिळ
उत्पादनासाठी पोषक वातावरण मिळत नसल्याने गावरान जांभळे दुर्मिळ होत आहेत. गेल्या दोन-चार वर्षांपासून जांभळाची जुनी झाडेही कमी झाली आहेत. शिल्लक राहिलेली झाडेही फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाही. तसेच पूर्वीच्या प्रमाणात झाडांची लागवड आता केली जात नाही. नवीन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही. त्यामुळे गावरान जांभळाचा पहिल्याप्रमाणे आस्वाद घेणे दुर्मिळ झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.