Unseasonal Rain
Unseasonal Rainagrowon

Unseasonal Rain : सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान; पिकांचे तत्काळ पंचनामे करा

Unseasonal Rains Solapur : माळशिरस तालुक्यात अनेक भागात काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
Published on

Solapur : माळशिरस तालुक्यात अनेक भागात काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालय येथे तहसीलदार सुरेश शेजुळ यांना देण्यात आले.

अवकाळी पावसामुळे शेतामधील डाळिंब, आंबा, कांदा, ऊस या पिकासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बागेतील आंबा उतरवण्याचे काम चालू असतानाच पाऊस आल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरांसाठी चारा असलेले कडवळ व इतर चारा पीके पाण्याखाली वाहून गेले आहे. तसेच डाळिंबाच्या बागेलाही मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे.

Unseasonal Rain
Solapur Weather : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळ अन् मॉन्सूनपूर्व पाऊस

त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने अवकाळी पावसामुळे झालेल्या संपूर्ण माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी तालुकाध्यक्ष अजित बोरकर, ज्येष्ठ नेते मगन काळे, सचिन शेंडगे, गोपाळ घार्गे अमरसिंह माने -देशमुख राष्ट्रवादीचे शामराव बंडगर, सोमनाथ पिसे उपस्थित होते.

पाणीपातळी समाधानकारक असल्यामुळे पदरमोड करून रब्बी लागवडीचा पेरा वाढवला. आता अस्मानीमुळे, ‘तेलही गेले, तूपही गेले...’ अशी गत झाली.

– गणेश चौधरी, मका उत्पादक, कुसुंबा, ता. जि. धुळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com