
Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी (ता. २०) ठिकठिकाणी वादळासह मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. ढगांचा गडगडाट अन् विजांचा कडकडाट दिवसभर सुरू होता. आता पावसाळाच सुरू झाला, असे वातावरण झाल्याची चर्चा शेतकरी आणि नागरिकांत सुरू झाली आहे.
नाझरेत वादळी पाऊस
नाझरे परिसरातील चोपडी, बलवडी, पाचेगाव, उदनवाडी, हातीद, बुद्धेहाळ, वाटंबरे, वझरे परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन झाले.
सायंकाळी साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान नाझरे परिसरातील विविध गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शेतातील काही झाडे पडल्याचे दिसून आले. मुसळधार पावसामुळे रानात भरपूर पाणी साठले होते. ग्रामीण भागातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. मान्सून पूर्वचा पहिला पाऊस दमदार झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
बार्शीत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस
बार्शी शहर व परिसराला मंगळवारी (ता. २०) दुपारी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. मंगळवारी सकाळपासूनच प्रचंड उष्मा होता. त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना पावसाच्या या गारव्याने दिलासा मिळाला.
मागील काही दिवसांपासून बार्शीत पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. परंतु मंगळवारी दुपारी झालेला पाऊस खूप मोठा होता. यामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाला. यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले. तर अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. वादळी वारे आणि पाऊस सुरू झाल्याने शहरात अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.
वागदरीसह गोगाव, खैराट, भुरीकवठे, किरनळी, घोळसगाव, शिरवळवाडी, शिरवळ, बोरगाव, बादौला या परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी बारा वाजल्यापासून ढग जमायला लागले. दुपारी दीड वाजता विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दीड ते तीनपर्यंत या परिसरात दमदार असा पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.