Crop Damage Survey : पूर्व हवेलीत पिकांचे पंचनामे सुरू

Heavy Rain Crop Loss : पूर्व हवेलीतील सर्व गावचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राममहसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना कोलते यांनी दिल्या आहेत.
Rain Crop Damage
Rain Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News : पूर्व हवेलीतील गावांत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची व पिकांची पाहणी केली असून, पिकांचे पंचनामे सुरू आहेत, अशी माहिती हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी वाघोली येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली.

पूर्व हवेलीतील सर्व गावचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राममहसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना कोलते यांनी दिल्या आहेत.

Rain Crop Damage
Onion Crop Damage : मराठवाड्यातील कांद्यावर पावसाचा आघात

अनुषंगाने अष्टापूर गावचे सरपंच पुष्पा कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्‍यामराव कोतवाल, सुरेश कोतवाल, माजी सरपंच कविता जगताप, ग्रामपंचायत सदस्य संजय कोतवाल, माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल, दत्तात्रय कटके यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन ग्राम महसूल अधिकारी, कृषी अधिकारी अादींना पंचनामे करावे, असे जाहीर आवाहन केले.

Rain Crop Damage
Rain Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात ३,७०० हेक्टरवरील पिके जमीनदोस्त; मोठे नुकसान

शिंदवणे, वळती, तरडे, अष्टापूर येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अष्टापूर माळवाडी परिसरामध्ये देविदास कोतवाल यांच्या भुईमूग व पालक या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तसेच शांताराम कोतवाल, बापूराव सदाशिव, हनुमंत कोतवाल, किसन कोतवाल, मारुती कोतवाल, हनुमंत राजवडे यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अष्टापूर गावातील खोलशेत, या ठिकाणी संदीप कोतवाल, रामदास कोतवाल, दीपक कोतवाल, गोपीचंद कोतवाल, प्रभाकर कोतवाल या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com