
Chh. Sambhajinagar News : मॉन्सून पूर्व पावसामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पावसासोबतच वाढती आर्द्रता कांद्याचे नुकसान वाढवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शुक्रवारी (ता.३०) मराठवाड्यातील प्रगतिशील, प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याशी संवादादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांचे कांदा नुकसानीकडे लक्ष वेधले होते.
माहितीनुसार, नुकसानीत लेट रब्बी व उन्हाळी हंगामातील कांदा पिकाचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेल्या कांद्याचे कुजणे सुरू झाले आहे.
कांद्याचा रंग बदलून तो खराब होतो आहे. ज्यामुळे बाजारात त्याला योग्य दर मिळत नाही. दरम्यान, नुकसान झालेल्या कांदा पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परतूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात कांदा हे नगदी पीक मानले जाते. तालुक्यातील २२४ गावा पैकी १५० गाव शिवारात रब्बी हंगाम २०२४-२५ मधील कांदा पिकाचे लागवड क्षेत्र ८०५० हेकटर होते. मात्र, गेल्या काही वर्षापासून कांद्याच्या भावापेक्षा उत्पादन खर्च अधिक होत आहे. त्या तुलनेत अगदी कमी भाव मिळत आहे. एक एकर कांदा लागवडीला सुमारे ७० ते ८० हजार रुपयेपेक्षा जास्त खर्च होतो.
मात्र आज जे भाव मिळत आहे त्यात लागवडीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याने पुढे भाव वाढतील. या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कांदा चाळीत साठवून ठेवला. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात मोठी वाढ होऊन पारा ४२ अंशापर्यंत गेला.
तापमान वाढीनंतर गेल्या काही दिवसांपासून सलग जोरदार पाऊस होत असल्यामुळे अचानक झालेल्या वातावरणातील गारव्याने कांदा सादळतोय. अनेक ठिकाणी भाजलेला कांदा सडतोय. केलेल्या अफाट खर्चाच्या तुलनेत खर्च निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
साडेतीन हजार हेक्टरवर फटका
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर वरील कांदा पिकाचे पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती आष्टीचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी दिली. नुकसानीचे पंचनामे सुरू असून ७० टक्के पंचनामे आटोपले आहेत. नुकसान झालेल्या कांद्यात लेट रब्बी व उन्हाळी कांद्याचा समावेश, असल्याचेही श्री तरटे म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.