Shwetkranti 2.0 : केंद्रीय मंत्री शहांच्या हस्ते ‘श्‍वेतक्रांती २.०’चा प्रारंभ

Amit Shah : देशातील दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ‘श्‍वेतक्रांती २.०’चा गुरुवारी (ता. १९) प्रारंभ केले.
Amit Shah
Amit ShahAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : देशातील दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ‘श्‍वेतक्रांती २.०’चा गुरुवारी (ता. १९) प्रारंभ केले. ज्याद्वारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने एक व्यापक उपक्रम राबविला जाणार आहे.

महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, दुग्धोत्पादन वाढवणे, दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि दुग्धव्यवसाय निर्यातीला प्रोत्साहन देणे या चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. हा उपक्रम मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या १०० दिवसांत सुरू करण्यात आलेल्या तीन उपक्रमांपैकी एक आहे.

Amit Shah
Amit Shaha : सहकारमुळे शेती क्षेत्राला आधार मिळाला : अमित शहा

बहुतेक महिला डेअरी क्षेत्रात गुंतलेल्या आहेत, त्यापैकी काही एकट्या गुजरातमध्ये ६०,००० कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहेत. हा नवीन उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणावर आणि कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळकट करण्यावर भर देईल, असे आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना अमित शाह यांनी सांगितले.

Amit Shah
Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

तसेच, यावेळी शाह यांनी देशभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि डेअरी सहकारी संस्थांमध्ये मायक्रो-एटीएम बसवण्याचेही लोकार्पण केले. याशिवाय, त्यांनी ६७,९३० प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या (पीएसीएस) संगणकीकरणासाठी कामे करण्याची आदर्श पद्धती (एसओपी) जारी केली.

‘एनडीडीबी’ करणार पतपुरवठा

दरम्यान, श्वेतक्रांती २.५ अंतर्गत, येत्या पाच वर्षांत दुग्ध सहकारी संस्थांकडून दूध खरेदी ५० टक्क्यांनी वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेत एक लाख नवीन आणि विद्यमान जिल्हा सहकारी संस्था, बहुउद्देशीय जिल्हा सहकारी संस्था आणि बहुउद्देशीय ‘पीएसीएस’ची स्थापना आणि बळकटीकरण समाविष्ट आहे, जे आवश्यक पायाभूत सुविधांसह दूध मार्गांशी जोडले जातील. सुरुवातीला राष्ट्रीय दुग्ध विकास विभाग (एनडीडीबी) स्वतःच्या संसाधनांमधून या उपक्रमाला पतपुरवठा करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com