MGNREGA Horticulture Cultivation: ‘रोहयो’च्या पाठबळाने ४०,८०० हेक्टरवर फळबाग लागवड, शेतकऱ्यांना नवा दिलासा!

Fruit Farming Subsidy: राज्यातील कृषी क्षेत्राला बळ देण्यासाठी ‘रोजगार हमी योजने’च्या (रोहयो) अंतर्गत तब्बल ४०,८०० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून, फळउत्पादन वाढीस चालना मिळेल. सरकारच्या या पुढाकारामुळे कृषी अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे.
Horticulture
HorticultureAgrowon
Published on
Updated on

Nagar News: राज्यात यंदा आतापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उद्दिष्टाच्या ६८ टक्के म्हणजे ४० हजार ८१९ हेक्टरवर (६८.०३ टक्के) फळबाग लागवड झाली आहे. ७२ हजार ९०० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान मिळावे म्हणून ९० हजार ६९५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

आतापर्यंत लागवड क्षेत्रात पालघर जिल्हा अव्वल आहे तर दिलेल्या उद्दिष्टानुसार लागवड क्षेत्र पाहिले तर पाच जिल्ह्यांत उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आतापर्यंतची लागवड स्थिती पाहता यंदाही फळबाग लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसत असून, आणखी दोन महिन्यांत लागवड क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे.

Horticulture
Punjab Horticulture Revolution : पंजाबमध्ये फळबागांची लागवड १० वर्षात दीडटीने वाढली

शासनाचा फळबाग लागवडीवर भर आहे. पाच एकर क्षेत्राच्या आतील तसेच जॉबकार्ड असलेल्या शेतकऱ्यांना रोजगार मिळावा आणि फळबाग लागवडही व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान देत फळबाग लागवड केली जाते.

पाच एकरांपेक्षा अधिक क्षेत्र लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. यंदा बऱ्याच भागात पाण्याची स्थिती चांगली आहे. शिवाय फळबाग लागवड फायदेशीर ठरत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव पाहून अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळल्याचे पाहायला मिळत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून (नरेगा) फळबाग लागवड केली जात आहे.

ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा यासाठी ही योजना आहे. यंदा (२०२४-२५) राज्यात ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत उद्दिष्टाच्या ६८.०३ टक्के म्हणजे ४० हजार ८१९ हेक्टरवर लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी अनुदान मागणीसाठी केलेल्या जवळपास ९५ टक्के अर्जाला अर्जाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आलेली आहे. आतापर्यंतच्या लागवडीचा विचार करता लागवड क्षेत्रात सर्वाधिक पालघर जिल्ह्यात ३७९३ हेक्टरर लागवड झाली आहे.

Horticulture
Horticulture Scheme : फलोत्पादन योजनांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा

पालघर, धुळे, नंदुरबार, बुलडाणा आणि गडचिरोली जिल्ह्यांत लागवड अधिक झाली आहे. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, धाराशिव, हिंगोली, अकोला, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांत बऱ्यापैकी फळबाग लागवड झाली आहे. लातूरमध्ये सर्वांत कमी म्हणजे लक्ष्यांकाच्या १५.०१ टक्के फळबाग लागवड झाली आहे. राज्यात १० हजार ६२० कृषी सहायक असून त्यांना उद्दिष्ट देऊन लागवड करून घेतली जाते.

फळबाग लागवड स्थिती

लागवड लक्ष्यांक ६० हजार हेक्टर

लाभार्थी अर्ज संख्या ९०,६९५

लाभार्थी अर्ज मागणी क्षेत्र ७२,९०० हेक्टर

तांत्रिक मान्यता ६९,५८९ हेक्टर

तांत्रिक मान्यतेची टक्केवारी ९५

प्रशासकीय मान्यता ६८,६६५ हेक्टर

खड्डे खोदलेले क्षेत्र ४१,८६४ हेक्टर

आतापर्यंतची लागवड ४०,८१९ हेक्टर

(६८.०३ टक्के)

जिल्हानिहाय लागवड क्षेत्र (हेक्टर)

ठाणे ः १,१५४, पालघर ः ३,७२३, रायगड ः १,५८७, रत्नागिरी ः १,३६०, सिंधुदुर्ग ः १,२०९, नाशिक ः २,१५६, धुळे ः १,१३६, नंदुरबार ः २,५३८, जळगाव ः १,४०९, अहिल्यानगर ः १,७०४, पुणे ः १,३१८, सोलापूर ः १,८४५, सातारा ः ९७८, सांगली ः ७३३, कोल्हापूर ः ११५, छत्रपती संभाजीनगर ः ३६५, जालना ः ९७५, बीड ः ५३२, लातूर ः २२५, धाराशिव ः ७७५, नांदेड ः ४३१, परभणी ः ३४२, हिंगोली ः ४७१, बुलडाणा ः २,५५३, अकोला ः ९०२, वाशीम ः ७९३, अमरावती ः २,०००, यवतमाळ ः २,१९४, वर्धा ः ४४०, नागपूर ः ९४९, भंडारा ः ३८२, गोंदिया ः १,३८९, चंद्रपूर ः १,०६४, गडचिरोली ः १,०५६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com