Orchard Plantation : मनरेगाअंतर्गत ३६७ हेक्टर फळबाग लागवड

MGNREGA : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७३ शेतकऱ्यांना १ हजार ३७९ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
Fruit Crop
Orchard PlantationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदा (२०२४-२५) परभणी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १ हजार ४४० हेक्टर फळबाग तसेच फुलझाडांची लागवडीचे उद्दिष्ट असताना ४३६ लाभार्थी शेतकऱ्यांनी ३६७ हेक्टर फळबाग लागवड केली आहे. याअंतर्गत ११ लाख ८८ हजारांचा निधी खर्च झाला.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७३ शेतकऱ्यांना १ हजार ३७९ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ४०२ हेक्टरवर फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

Fruit Crop
Orchard Plantation : फळबाग योजनेमधून अकोला जिल्ह्यात ४०० हेक्टरवर लागवड

जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४३६ शेतकऱ्यांनी ३६७.७१ हेक्टरवर विविध फळझाडे तसेच फुलझाडांची लागवड केली आहे. त्यात परभणी तालुक्यातील ३३.८ हेक्टरमध्ये आंबा १४.३ हेक्टर, संत्रा १ हेक्टर, पेरू ४.२ हेक्टर, नारळ १ हेक्टर, केळी १२.८ हेक्टर, जिंतूर तालुक्यातील ९०.०७ हेक्टरमध्ये आंबा २७.९५० हेक्टर, चिकू १.४० हेक्टर, पेरू १४.८५ हेक्टर, संत्रा ७.८० हेक्टर, मोसंबी २.१०हेक्टर, सीताफळ ५ हेक्टर,

केळी २६.९७ हेक्टर, गुलाब ४ हेक्टर, सेलू तालुक्यातील १५.८९ हेक्टरमध्ये आंबा ३.४९ हेक्टर, चिकू ०.२ हेक्टर, लिंबू १.७६ हेक्टर, नारळ १.५५ हेक्टर, सीताफळ १ हेक्टर, केळीची ८.८५ हेक्टरवर लागवड आहे. मानवत तालुक्यात ५२.२ हेक्टरमध्ये आंबा ९.४ हेक्टर, पेरू २.६ हेक्टर, संत्रा १८ हेक्टर, केळी २१.८ हेक्टर, गुलाब ०.४ हेक्टर, पाथरी तालुक्यातील १४.५ हेक्टरमध्ये आंबा ८ हेक्टर, केळी ६.५ हेक्टर, सोनपेठ तालुक्यातील १२.८ हेक्टरमध्ये केळीची ७.६ हेक्टरवर लागवड आहे.

Fruit Crop
MGNREGA : सातारा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत अनागोंदी

गंगाखेड तालुक्यातील ४.३५ हेक्टरमध्ये आंबा ५.२ हेक्टर, केळी ७.६ हेक्टर, पालम तालुक्यातील ४८.६ हेक्टरमध्ये आंबा ३७ हेक्टर, पेरू ०.६ हेक्टर, केळी १० हेक्टर, पूर्णा तालुक्यातील ६५.९७ हेक्टरमध्ये आंबा १८.५९ हेक्टर, पेरू १.२५ हेक्टर, चिकू ०.५ हेक्टर, संत्रा ९.३३ हेक्टर, लिंबू ५.५५ हेक्टर, केळी २२.३५ हेक्टर, गुलाब २.८ हेक्टर, निशीगंधा १.१ हेक्टर, शेवग्याची ०.४० हेक्टरवर लागवड झाली. याअंतर्गत सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांत ११ लाख ८८ हजार रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मनरेगाअंतर्गत तालुकानिहाय फळबाग लागवड स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका उद्दिष्ट क्षेत्र लागवड क्षेत्र लाभार्थी संख्या

परभणी २४० ३३.८ ४८

जिंतूर २४० ९०.०७ ११७

सेलू १४० १५.८९ ११

मानवत १३५ ५२.२ ४९

पाथरी १४० १४.५ १६

सोनपेठ १३० १२.८ १८

गंगाखेड १४० ३४.२८ ३२

पालम १३५ ४८.६ ५९

पूर्णा १४० ६५.९७ ८६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com