PM Kisan Yojana: पीएम किसानच्या १५ व्या हफ्त्याची नोंदणी प्रक्रीया सुरू, असा करा अर्ज

PM Kisan News : पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात.
PM Kisan
PM KisanAgrowon
Published on
Updated on

PM Kisan Scheme 15th Installment : केंद्र सरकारकडून २८ जुलै रोजी देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात १४ व्या पीएम किसान सन्मान निधीचे पैसे जमा झाले. दरम्यान शेतकऱ्यांनी पंधराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान ज्या शेतकऱ्यांना अद्यापही नाव नोंदणी करायची आहे. त्यांनी याबाबत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तुम्ही सेवा केंद्रात अथवा घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करू शकता. त्यासाठीची प्रक्रिया सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.

देशातील शेतकऱ्यांना आधार म्हणून केंद्र सरकार अनेक योजना राबवते. यातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १४ हप्त्यांमध्ये करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात.

दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता जारी केला जातो. नव्या हप्त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या हप्त्याचे पैसे नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. २७ नोव्हेंबरपर्यंत हे पैसे येणे अपेक्षित आहे. योजनेंतर्गत केवळ अशाच शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळणार आहेत. ज्यांनी पीएम किसान सन्मान निधी दिला आहे.

PM Kisan
Waterfalls In Kolhapur : कोल्हापुरातील धबधब्यांवर जाण्याची बंदी उठवली, विकेंडला करा प्लॅन

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्यावी. यानंतर Farmers Corner वर क्लिक करावे. नवीन शेतकरी नोंदणी पर्याय निवडावा. यामधील Rural Farmer Registration किंवा Urban Farmer Registration पर्यायावर क्लिक करावा. त्यानंतर आधार, मोबाइल नंबर टाका आणि राज्य निवडा. त्यानंतर गेट ओटीपीवर क्लिक करा.

आता ओटीपी क्रमांक टाकून Proceed for Registration पर्याय निवडा. अधिक तपशीलावर प्रविष्ट करा आणि राज्य निवडल्यानंतर, जिल्हा, बँक आणि आधार कार्डानुसार माहिती प्रविष्ट करावी लागेल. यानंतर, आधार प्रमाणीकरणासाठी सबमिट बटणावर क्लिक करा अशी सूचना देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com