Swapnil Shinde
केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षातून तीन वेळा प्रत्येकी 2,000 रुपये म्हणजेच एकूण 6,000 रुपये वार्षिक मिळतात.
या योजनेचा 15 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे हस्तांतरित करण्यात आली.
पण काही चुकांमुळे शेतकऱ्यांचा हा हप्ता अडकू शकतो. यासाठी शासनाच्या नियमानुसार कामे करून घेणे आवश्यक आहे.
जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी केले नाही, तर तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता.
जमिनीची पडताळणी न केल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो. हे काम पीएम किसान योजनेंतर्गत होणे गरजेचे आहे. आपण अद्याप हे केले नसल्यास, आपण आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
जर तुम्ही दिलेला बँक खाते क्रमांक चुकीचा असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो.
याशिवाय फॉर्ममध्ये आधार क्रमांक, नाव, लिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारात काही चूक असल्यास, तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.