Fortified Rice : फोर्टिफाईड तांदळाबाबत अनभिज्ञता

Rationing Rice : पालीसह सुधागड तालुक्यात रेशनिंगमध्ये प्लास्टिक स्वरूपाचे तांदूळ अनेकांना सापडत आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले आहे. मात्र, ते फोर्टिफाईड तांदूळ असून लाभार्थी त्यापासून अनभिज्ञ आहेत.
Fortified Rice
Fortified RiceAgrowon
Published on
Updated on

Pali News : पालीसह सुधागड तालुक्यात रेशनिंगमध्ये प्लास्टिक स्वरूपाचे तांदूळ अनेकांना सापडत आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले आहे. मात्र, ते फोर्टिफाईड तांदूळ असून लाभार्थी त्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे याबाबत अफवांना उधाण आले.

पालीतील भोईआळी येथे नुकतेच अशा प्रकारचे तांदूळ सापडले आहेत. त्यामुळे शिधाधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रेशन दुकानातून लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळ दिला जात आहे. कुपोषणावर मात करण्याचा हा एक उपाय आहे. दररोज खाण्यात वापरल्या जाणाऱ्या तांदळापेक्षा हा वेगळा दिसत असतो. जनजागृती न केल्याने नागरिकांना तो प्लास्टिकचा असल्याचा संशय आहे. त्यामुळे नागरिक हे तांदूळ निवडून फेकून देत आहेत.

Fortified Rice
Rice Export : भारताच्या तांदूळ निर्यातबंधनामुळे जागतिक पातळीवर धास्ती

असा बनवला जातो तांदूळ

फोर्टिफाईड तांदळात सूक्ष्म पोषक तत्त्वे, विटामिन्स व खनिजांची मात्रा कृत्रिमरीत्या मिसळलेली असते. प्रथम तांदळाची भुकटी तयार केली जाते आणि त्यात हे सर्व पोषक तत्त्वे मिसळली जातात. या मिश्रणाला पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो. यालाच फोर्टिफाईड तांदूळ म्हणतात. हा तांदूळ १०० किलोमध्ये १ किलो मिसळून वितरित केला जातो.

फोर्टिफाईड तांदळात काय असते?

लोहखनिज - अशक्तपणा व तांबड्या पेशींची कमतरता दूर करते.

फॉलिक ॲसिड - गर्भाचा विकास व नवीन पेशी बनवते.

विटामिन बी १२ - मज्जा संस्थेचे कार्य सुरळीत सुरू ठेवते.

रेशन दुकानदारांची जबाबदारी

फोर्टिफाईड तांदळाची गुणवत्ता, चव व आरोग्यासाठी असणारे लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना त्याचा नमुना दाखवणे.

या तांदळाचा लाभ होण्यासाठी भात शिजवताना योग्य प्रमाणात पाणी टाकावे आणि उरलेले पाणी फेकून देवू नये. हे प्रत्येक लाभार्थ्याला समजावून सांगणे.

Fortified Rice
Paddy Procurement : भातखरेदी केंद्रात ऑनलाइन शेतकरी नोंदणीला मुदतवाढ
रेशन दुकानात प्लास्टिक तांदूळ मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा फोर्टिफाईड तांदूळ आहे हे जर खरे असेल, तर नागरिकांच्या तक्रारी का येतात? याचा छडा लावणे गरजेचे आहे. नागरिकांना या तांदळाबाबत माहिती दिली जाते का? हे तपासणे पुरवठा निरीक्षकाचे काम आहे.
दत्तात्रेय दळवी, अध्यक्ष, स्वयंपूर्ण सुधागड
रेशनिंग दुकानात मिळणारा हा फोर्टिफाईड तांदूळ आहे. या तांदळाबाबत जनजागृती करणे आणि लाभार्थ्यांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. -
उत्तम कुंभार, तहसीलदार, पाली-सुधागड
फोर्टिफाईड तांदूळ रेशन दुकानात मिळतोय. त्याला पाहून प्लॅस्टिक तांदळाची भेसळ असल्याची शंका येते. हा तांदूळ वेगळा दिसतो.
कल्पेश आंबेकर, तरुण, पाली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com