Paddy Procurement : भातखरेदी केंद्रात ऑनलाइन शेतकरी नोंदणीला मुदतवाढ

Registration for Paddy Procurement Centre : शेतकऱ्यांना नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळाली असून ही मुदतवाढ ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
Paddy Market
Paddy MarketAgrowon
Published on
Updated on

Boisar News : पालघर जिल्ह्यात भातखरेदी केंद्रासाठी नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळाली असून ही मुदतवाढ ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे या नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना आपली नोंदणी ऑनलाइन पोर्टलवर करता येणार आहे.

खरीप हंगामाचे भात खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत किमतीवर जिल्हाभर भातखरेदी केंद्र चालवली जातात. या खरेदी केंद्रांमध्ये शेतकरी वर्ग आपला भात विक्री करत असतो.

Paddy Market
Paddy Crop Damage : नागपुर जिल्ह्यातील धानपट्ट्यात १९७६ हेक्‍टरवर नुकसान

यासाठी नियमानुसार शेतकरी वगनि ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेट व इतर सुविधा अभावी शेतकऱ्यांना नोंदणी करणे अडचणीचे ठरले होते.

मुदत निघून जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. हे लक्षात घेत जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासह कृषी विभागाकडे ऑनलाइन नोंदणीसाठी मुदत वाढ मिळावी, यासाठी वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे.

Paddy Market
Paddy Crop Damage : भोर तालुक्यात पावसात नाचणी, वरईचे नुकसान

प्रशासनाने ही बाब राज्य शासनाला कळवल्यानंतर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने ऑनलाइन पोर्टलवर पुरेशी नोंदणी झाली नसल्याने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.

लोकसेवक म्हणून येथील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी बांधील आहे. शेतकऱ्यांच्या मुदतवाढीची समस्या सुटल्याचा आनंद आहे. सरकारच्या सकारात्मकतेमुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
राजेश पाटील, आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com