Udhhav Thackrey : योजनांचा सुकाळ अन् अंमलबजावणीचा दुष्काळ

Farmers Issue : राज्यातले सरकारही तसेच जुमलेबाज आहे. योजनाचा सुकाळ अन् अंमलबजावणीचा दुष्काळ असे सुरू आहे.
Uddhav Thackrey
Uddhav ThackreyAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : ‘‘मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनिती योजना जाहीर केल्या आणि त्यापैकी किती अमलात आणल्या. राज्यातले सरकारही तसेच जुमलेबाज आहे. योजनाचा सुकाळ अन् अंमलबजावणीचा दुष्काळ असे सुरू आहे. केलेल्या पापावर पांघरून घालण्यासाठी अनेक योजनांची घोषणा सरकार करते आहे,’’ अशी घनाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी (ता.७) आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात श्री. ठाकरे बोलत होते. शिवसेना नेते विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदय राजपूत, लक्ष्मणराव वडले, ज्योती ठाकरे आदी उपस्थित होते. या वेळी भाजपचे राजू शिंदे यांच्यासह ५ नगरसेवक, एक जिल्हा परिषद सदस्य, इतरही जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना पक्षाविषयी निष्ठा पाहून उमेदवारी दिली. त्यांचा विजय अपेक्षित होता, परंतु पराभव झाला. इतरत्र विजय झाला असताना इथला पराभव जिव्हारी लागला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचाच या इच्छेने आलोय. महाराष्ट्र संतांची, थोर पुरुषांची भूमी. ही अस्मिता जपायची आहे.

(ॲग्रो विशेष)

Uddhav Thackrey
Uddhav Thackeray : थापा, घोषणा खूप झाल्या आता कर्जमुक्ती करा; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

गद्दार आणि लाचारांचा महाराष्ट्र ही ओळख होऊ द्यायची नाही. सत्तेत असताना कर्जमुक्ती बोलून नाही तर करून दाखविली. इथली गुंठेवारी, समांतर जलवाहिनी, उद्यान आदी योजना मार्गी लावण्याचे काम केले.

शहराला छत्रपती संभाजीनगर आणि इथल्या विमानतळालाही छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याचा निर्णय घेतला. विद्यमान सरकारला मात्र अजून लोकसभा मतदारसंघाचे नाव आणि विमानतळाचे नाव बदलता आले नाही.’’

‘‘सत्ताधारी लोक ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबत असल्याचा टोलाही श्री. ठाकरे यांनी लगावला. ‘‘राज्याच्या अधिवेशनात जाहीर होणाऱ्या योजना औट घटकाच्या असतील. निवडणूक जिंकण्यासाठीची ही जुमलेबाजी टिकणार नाही. भाजपातून आपल्या शिवसेना पक्षासह इतर पक्षात जाणाऱ्यांना कळून चुकले.

Uddhav Thackrey
Uddhav Thackery : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका; ठाकरेंनी कृषिमंत्र्यांवर डागली तोफ

आता अटल- अडवाणींचा भाजप शिल्लक नाही, तर तो व्यापाऱ्यांचा झाला आहे. त्यामुळे गावागावात जाऊन शासनाच्या थापेबाज योजनांची पोलखोल करा. लोकसभा निवडणुकीत मशाल निशाणीचा प्रचार करायला जास्त वेळ मिळाला नाही. त्यामुळे विरोधकांनी मिळवलेला विजय खरा नाही. आता मात्र मशाल हाती घेऊन शासनकर्त्यांची पापे जाळा,’’ असे आवाहन देखील श्री. ठाकरे यांनी केले.

‘आरक्षणाची टक्केवारी वाढविण्याचा ठराव आणा,’’

‘‘आरक्षणासंबंधी चर्चा करण्यास विचारवंतांना बोलवा. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घ्या. मराठा आणि ओबीसींना एकमेकांच्या विरोधात भांडायला लावू नका. मुख्यमंत्र्यांनी राज्य विधिमंडळात आरक्षणाची टक्केवारी वाढविण्याचा ठराव आणावा, तो केंद्राकडे पाठवावा. त्याला शिवसेना राज्य विधिमंडळ आणि संसदेतही पाठिंबा देईल,’’ असे श्री. ठाकरे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com