Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे दोन दिवस यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर

Latest Marathi News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
Udhhav Thackeray
Udhhav Thackeray Agrowon

Yavatmal News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. पक्षातर्फे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता.१२) व बुधवारी (ता.१३) जनसंवाद सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना ते संबोधित करणार आहेत.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावर गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकत आहे. पक्षफुटीनंतर जिल्ह्यात एकही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार किंवा आमदार नाही. यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी, दारव्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे शिवसेनेचे एकेकाळचे जिल्ह्यातील दिग्गज नेते होत.

Udhhav Thackeray
Udhhav Thackeray : आताचे सरकार मतपेटीऐवजी खोक्‍यातून उदयास आलेले

आता ते शिंदे गटात गेल्याने जिल्ह्यात पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जिल्ह्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद सभेच्या निमित्ताने नव्याने पक्षाची बांधणी करीत आहेत. त्यांचा राज्यभरात जनसंवाद दौरा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारी (ता. १२) दुपारी १२ वाजता राळेगाव येथे जनसंवाद सभा होणार आहे.

Udhhav Thackeray
Udhhav Thackeray : प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही

त्यानंतर यवतमाळला काही तास विश्रांती घेतील. यावेळेत ते जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेणार आहे. तर, बुधवारी (ता. १३) पुसद येथे सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे. मंगळवारी रात्री दिग्रस येथे ठाकरे यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर १३ फेब्रुवारीला वाशीम जिल्ह्यातील वाशीम व कारंजा या दोन ठिकाणी ते जनसंवाद सभांना संबोधित करणार आहे.

लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान ते लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला आहे, हे विशेष. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे मोर्चेबांधणी सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com