Udhhav Thackeray
Udhhav ThackerayAgrowon

Udhhav Thackeray : आताचे सरकार मतपेटीऐवजी खोक्‍यातून उदयास आलेले

Udhhav Thackeray Vidarbha Visit : पूर्वी सरकार मतपेटीतून उदयास येत होते आता सरकारचा उदय खोक्‍यातून होतो, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. १०) अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना केली.
Published on

Amravati News : पूर्वी सरकार मतपेटीतून उदयास येत होते आता सरकारचा उदय खोक्‍यातून होतो, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. १०) अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना केली.

पक्ष बांधणीच्या निमित्ताने विदर्भाच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. ९) आपल्या दौऱ्याची सुरुवात पोहरादेवी (वाशीम) येथून केली.

त्यानंतर सोमवारी (ता. १०) ते अमरावती येथे दाखल झाले. श्री. ठाकरे म्हणाले, की सध्या कोणाला पैशांच्या बळावर तर कोणाला कारवाईची धमकी देत आपल्या पक्षात नेण्याची प्रथा रुढ झाली आहे. त्याकरिता तपास यंत्रणांचा सर्रास दुरुपयोग केला जात आहे. सामान्य जनता आता चुप असली तरी या सर्व प्रकाराचा येत्या निवडणुकांमध्ये निश्‍चितच हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही.

Udhhav Thackeray
Udhhav Thackeray : थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या : ठाकरे

तपास यंत्रणांच्या कारवाईची धमकी म्हणजे आजच्या काळात भाजप प्रवेशाचे निमंत्रण ठरत आहे. एकदा का भाजपमध्ये प्रवेश केला की मग कितीही कोटींचा गैरव्यवहार किंवा कोणताही गंभीर आरोप तुमच्यावर असला तर त्याची चौकशी करण्याचे धारिष्ट कोणी दाखवित नाही, अशी स्थिती देश आणि राज्यात आहे. अशांना धडा शिकविण्यासाठी ‘राईट टू रिकॉल’ या माध्यमातून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार सामान्यांना मिळायला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

Udhhav Thackeray
Udhhav Thackeray : सर्वांच्या साथीने भविष्यातील आव्हानांचा सामना शक्य

ते म्हणाले, की पूर्वी पक्ष फोडला जात होता आता पक्ष चोरणाऱ्या टोळ्या कार्यान्वित झाल्या आहेत. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचादेखील गैरवापर भाजपकडून होत आहे. माझ्या पक्षाचे नाव इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाही नाही. असे असेल तर निवडणूक आयोगाचेच नाव आम्ही बदलून टाकू; हे आयोगाला मान्य असेल का?

रात्रीच्या गाठीभेटीतूनच घडली गद्दारी

शरद पवारांनी शिवसेनेला भाजपपासून दूर नेले, या दाव्याची त्यांनी खिल्ली उडवली. मी रुग्णालयात आजारी असताना रात्री कपडे बदलून गुप्त गाठीभेटी कोण घेत होते, असा प्रश्‍नही श्री. ठाकरे यांनी केला. रात्रीच्या गाठीभेटीतूनच गद्दारीचे षडयंत्र रचले गेले, अशी टीका त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com