Konkan Cashew : कोकण काजू उत्पादनावर क्रांती करू शकतो

Ratnagiri Farmers : रत्नागिरी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जगातील विविध लागवडीकडे वळले पाहिजे. भात, नाचणी, फळबागांचे लागवड क्षेत्र वाढले पाहिजे. त्यासाठी आत्मपरीक्षण केले पाहिजे.
Konkan Cashew
Konkan Cashewagrowon
Published on
Updated on

Ratnagiri Cashew : ब्राझीलप्रमाणे कोकणदेखील काजू उत्पादनावर क्रांती करू शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेमध्ये प्रयोगशील आणि विविध स्पर्धेतील विजयी शेतकऱ्यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. या वेळी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, की रत्नागिरीचा हापूस आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जगातील विविध लागवडीकडे वळले पाहिजे. भात, नाचणी, फळबागांचे लागवड क्षेत्र वाढले पाहिजे. त्यासाठी आत्मपरीक्षण केले पाहिजे.

नोकरीपेक्षा १० पट पैसे हे शेतीमधून मिळवू शकतो. त्यासाठी शेती वाढविली पाहिजे. शेती उत्पन्नाला कर नाही. शासनाने विविध योजना दिल्या आहेत. या योजनांचा फायदा घेऊन शेती करायला हवी. निसर्ग सुधारायचा असेल आणि प्रक्रिया उद्योग निर्माण करायचा असेल तर बांबू लागवडीला पर्याय नाही. पुढचे कृषी प्रदर्शन हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे असेल, असेही त्यांनी सांगितले.

Konkan Cashew
Konkan Agro Tourism: माझ्या कोकणचो रुबाब भारी!

याप्रसंगी फलोत्पादन मंत्री गोगावले म्हणाले, की फळबागा लागवडीसाठी १०० टक्के फलोत्पादन पूर्वीची शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना सुरू करणारा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला जाईल. दर्जेदार बियाणे, खते शेतकऱ्यांना वेळेत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करावी. फळबाग वाढीसाठीचे यंदाचे १९०० हेक्टर उद्दिष्ट पूर्ण करावे. म्हणजे मुंबईत होणारे स्थलांतर थांबेल. बांबूला ७ लाख सबसिडी दिली जाते. शिवाय तो टनावर विक्री होतो. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com