Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत परप्रांतीय महिला; १ हजारपेक्षा जास्त बोगस खाती उघड

Maharashtra Politics : महाराष्ट्रात या योजनेत १ हजार १७१ अर्ज भरल्याचे खळबळबजणक माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद झाला आहे.
Ladaki Bahin Yojana
Ladaki Bahin Yojanaagrowon
Published on
Updated on

Ladaki Bahin Yojana Scam : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थी आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या योजनेत उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील महिलांनाचा समावेश आहे. या महिलांनी लातूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवण्यात आले आहे. महाराष्ट्रात या योजनेत १ हजार १७१ अर्ज भरल्याचे खळबळबजणक माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. बार्शी तालुक्यात २२ अर्ज बोगस निघाले आहेत.

ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज बोगस निघाले आहेत त्यांचे पैसे त्वरीत थांबवण्यात आले आहेत. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील एका गावात एकही मुस्लीम महिला नसताना बनावट खाते केल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून आधार क्रमांक, बँक खात्याच्या आधारे तपासणी करण्यात आली. ही बनावट खाती उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थानामधील असल्याचे उघड झाले आहे. यात लॉगईन आयडीचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे.

Ladaki Bahin Yojana
Ladaki Bahin Scheme : 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं

अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, बनावट लॉगिन आयडीचा गैरवापर करुन हा घोटाळा करण्यात आला आहे. सरकारी वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करण्याची सुविधा दिली होती. ‘मुनमुन ठाकरे, अंगणवाडी सेविका, हजारवाडी, जि. सांगली’ ‘अनवरा बेगम, अंगणवाडी सेविका, बोरगाव बु., जि. लातूर’ या २ बोगस आयडीद्वारे सुमारे १ हजार १७१ अर्ज भरले गेले. प्रत्यक्ष चौकशीत अशा अंगणवाडी सेविका नसल्याचं उघड झाले आहे.

लाडकी बहीण योजनेचा परप्रांतीयांनी नकली आधार क्रमांक तसेच चुकीची अस्पष्ट कागदपत्रे जोडून अपलोड केली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी पारदर्शी होत नसल्याचा अंदाज घेऊन हे अर्ज करण्यात आले आहेत. याचाच फायदा घेऊन लाडक्या बहिणीचे पैसे लाटले गेले. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिस, महसूल, तसंच महिला व बालविकास विभाग या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

कसून चौकशी करून दोषींवर कारवाई

लाडकी बहीण योजनेत काही बनावट खाती समोर आल्याची माहिती आहे. याबाबत कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करू असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर तर सरकारी एजन्सीनं उत्तर दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. आता अशा परप्रांतीय भामट्या बहिणींकडून वसुली करण्यात येईल, असं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com