Parbhani News : परभणी जिल्ह्यातील २२ पैकी १२ लघु तलाव कोरडे पडले आहेत तर ६ लघु तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. केवळ ४ तलावांमध्ये सरासरी ३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मासोळी (ता. गंगाखेड) व करपरा (ता. जिंतूर) या दोन मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा शून्य झाला आहे. परिणामी या प्रकल्पांवर अवलंबून असलेली गावे, वाड्या, वस्त्यांवरील नागरिक तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून गुरुवारी (ता. २३) घेण्यात आलेल्या लघु तसेच मध्यम प्रकल्पांतील पाणी पातळीच्या नोंदी नुसार देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, केहाळ, दहेगाव, भोसी, आडगाव (सर्व ता. जिंतूर), पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत) हे १२ लघु तलाव कोरडे पडले आहेत.
नखातवाडी (ता. सोनपेठ), कोद्री (ता. गंगाखेड), टाकळगाव (ता. गंगाखेड), कवड (ता. जिंतूर), मांडवी (ता. जिंतूर), पाडाळी (ता. जिंतूर) या ६ लघु तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. झरी (ता.पाथरी) तलावांमध्ये ४८ टक्के, तांदुळवाडी (ता.पालम) तलावात १३ टक्के,
राणीसावरगाव (ता.गंगाखेड) तलावात १२ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) तलावात १ टक्का मिळून ४ लघु तलावांमध्ये सरासरी १.४७४ दलघमी म्हणजेच ३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. २०२३ मधील २३ मे रोजी जिल्ह्यातील ११ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ६.४४० दलघमी (१५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा संपला..
गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यातील निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा राहिला नाही. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
२०२३ मधील २३ मे रोजी करपरा मध्यम प्रकल्पांमध्ये ६.४५० दलघमी (२६ टक्के) व मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ८.७२५ दलघमी (३२ टक्के) तर दोन प्रकल्पांमध्ये सरासरी १५.१७५८ दलघमी (२९.१६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता.लघु तसेच मध्यम प्रकल्पांवर सर्वच तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मॉन्सूनचे वेळेवर आगमन तसेच समान वितरण झाले नाही तर पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.