Turtle Conservation Issue : रायगडमध्ये तापमानवाढीमुळे कासवसंवर्धन संकटात

Heat Issue : तापमानवाढीमुळे यंदा माणसांबरोबरच पशुपक्षीही बेजार झाले आहेत असून काही जीवांच्या अस्‍तित्‍वच संकटात आले आहे.
Turtle Conservation
Turtle Conservation Agrowon
Published on
Updated on

Alibaug News : तापमानवाढीमुळे यंदा माणसांबरोबरच पशुपक्षीही बेजार झाले आहेत असून काही जीवांच्या अस्‍तित्‍वच संकटात आले आहे. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या प्रजातीला तापमानावाढीचा फटका सहन करावा लागत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे.

Turtle Conservation
Turtle Conservation : कासव संवर्धनात गुहागर राज्यात अव्वल

रायगड जिल्ह्याच्‍या किनारपट्टीवर ऑलिव्‍ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. काही वर्षांपासून वनविभाग आणि कासव मित्रांच्‍या सहकार्याने कासव संवर्धन कार्यक्रमही सुरू आहे, मात्र यंदा कासव संवर्धनाला फटका बसला आहे. उष्मा लाटेमुळे कासवांची अंडी उबवून पिल्‍ले बाहेर पडण्‍याच्‍या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. कासवांनी घातलेल्या अंड्यापैकी फक्त ४० टक्के अंड्यातून पिल्ले बाहेर पडली, तर ६० टक्के अंडी खराब झाली आहेत.

ऑलिव्ह रिडले कासव नोव्हेंबर ते मार्चदरम्‍यान प्रजननासाठी समुद्रकिनाऱ्यावर येतात. कासवांनी अंडी दिल्यानंतर ५५ ते ६० दिवसांत पिल्ले बाहेर येतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील दिवेआगर, राजपुरी खाडीकिनारी कासवे मोठ्या संख्येने प्रजननासाठी येतात. पिल्ले अंड्यातून बाहेर पडताच समुद्राकडे धाव घेण्याचा अनुभव विलक्षण असतो. हा क्षण अनुभवण्यासाठी काही पर्यटकही आवर्जून येतात.

Turtle Conservation
Iran President Ebrahim Raisi : राष्ट्रपती रईसी यांच्या मृत्यूवर भारतात राष्ट्रीय शोक

तापलेल्या वाळूने अंडी खराब

वन विभागाने कासव मित्रांच्‍या सहकार्याने, श्रीवर्धन, दिवेआगर आणि हरिहरेश्‍वर येथील किनाऱ्यावर कासवांच्‍या अंड्याची बिळे शोधून संवर्धन केले आहे. अशीच संवर्धन मोहीम संपूर्ण कोकण किनारपट्टीवर राबवली जात आहे. वाळूमध्ये अंडी सोडून मादी समुद्रात निघून जाते. त्यानंतर ही अंडी वाळूतील योग्य तापमानावर राहणे आवश्यक असते. ३१ अंशापर्यंत सरासरी तापमान योग्य असते. यापूर्वी सापडलेल्‍या अंड्यांपैकी खराब होण्‍याचे प्रमाण १० ते १५ टक्‍के असे.

कासव बचाव मोहिेमेला वेग

दरवर्षी कोकण किनारपट्टीवर ऑलिव्‍ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्‍यासाठी मोठ्या संख्येने येतात. पूर्वी कासवे अंडी घालून गेल्‍यानंतर परिसरातील ग्रामस्‍थ अंडी शोधून ती खाण्‍यासाठी वापरत. परंतु वन विभागाने पुढाकार घेतल्‍यानंतर कासव बचाव मोहिमेला वेग आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com