Turmeric Cultivation : हिंगोलीत हळद लागवडीत ८ हजार हेक्टरने वाढ

Turmeric Farming : हिंगोली जिल्ह्यात यंदा एकूण ३२ हजार ५५१ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. बाजारभावात सुधारणा झाल्यामुळे शेतकरी परत हळद लागवडीकडे वळले आहेत.
Turmeric Farming
Turmeric Farming Agrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदा एकूण ३२ हजार ५५१ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. बाजारभावात सुधारणा झाल्यामुळे शेतकरी परत हळद लागवडीकडे वळले आहेत. परिणामी यंदा हळदीच्या क्षेत्रात ८ हजार ३८० हेक्टरने वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.

गतवर्षी २४ हजार १७१ हेक्टरवर हळद लागवड झाली होती. हिंगोलीतील शेतकऱ्यांचे पारंपरिक पीक असलेल्या हळदीच्या उत्पादकतेत सुधारित लागवड तंत्रज्ञान तसेच काटेकोर पीक व्यवस्थापनातून वाढ झाली. लागवड ते काढणी, काढणी पश्चात कामांचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे श्रम, मजुरीवरील खर्च कमी झाला.

Turmeric Farming
Turmeric Farming Management : वाफसा पाहून सिंचनावर भर

परंतु तीन-चार वर्षांत सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे कंदकुज, कंदसडीचे वाढलेले प्रमाण आदी कारणांनी हळदीच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. निविष्ठा, इंधन, मजुरीच्या दरात वाढ झाली. मागील अनेक वर्षे हळदीचे बाजारभाव पाच ते सात हजारांच्या दरम्यान राहिले. आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात काही वर्षांत घट झाली. २०२० मध्ये ४१ हजार ५३८ हेक्टर लागवड होती. २०२१ मध्ये ४९ हजार ७६४ हेक्टरपर्यंत वाढ झाली.

परंतु २०२२ मध्ये हळदीचे क्षेत्र ३५ हजार ८१ हेक्टर तसेच २०२३ मध्ये २४ हजार १७१ हेक्टरपर्यंत कमी झाले. २०२३ मधील जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हळददर सहा हजारांपर्यंत होते. त्यानंतर दरात सुधारणा होऊन सरासरी दर १० हजारांवर गेले. त्यामुळे यंदा शेतकरी पुन्हा हळदीकडे वळले. अनेकांनी पुढील वर्षीच्या बेण्यासाठी लागवड केली आहे. त्यामुळे क्षेत्रात वाढ झाली.

Turmeric Farming
Turmeric Farming : हळदीचे क्षेत्र १० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता
बाजारभावात सुधारणा झाली आहे. कृषी विभाग व हळद संशोधन केंद्राद्वारे हळद लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली. त्यामुळे हळदीच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे.
राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक,बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत, जि. हिंगोली
सोयाबीन, कापसाला दर नाहीत. मागील वर्षापासून हळदीच्या दरात वाढ झाली आहे. वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचे पारंपरिक पीक असल्यामुळे हळद पिकाचे चांगले व्यवस्थापन करतात. यंदा सिंचनासाठी पाणी आहे. वसमत येथील स्थानिक बाजारपेठ आहे. त्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली.
प्रल्हाद बोरगड, अध्यक्ष, सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, सातेफळ, ता. वसमत, जि. हिंगोली

हिंगोली जिल्हा वर्षनिहाय हळद लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)

वर्ष लागवड क्षेत्र

२०२० ४१५३८

२०२१ ४९७६४

२०२२ ३५०८१

२०२३ २४१७१

२०२४ ३२५५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com