Energy Crops Cultivation : जैवविविधतेचा ऱ्हास रोखून व्हावी ऊर्जा पिकांची लागवड

Biodiversity Conservation : इंग्लंड येथील सरे विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ऊर्जा निर्मितीच्या पिकांच्या लागवड नेमकी कोठे करावी, या संदर्भात अभ्यास केला आहे.
Energy Crops Farming
Energy Crops FarmingAgrowon
Published on
Updated on

Agricultural Ecosystem : इंग्लंड येथील सरे विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ऊर्जा निर्मितीच्या पिकांच्या लागवड नेमकी कोठे करावी, या संदर्भात अभ्यास केला आहे. या अभ्यासामुळे अखाद्य तेलांच्या उत्पादनासाठी केल्या जाणाऱ्या वारेमाप लागवडीमुळे होणारे जैवविविधतेचे नुकसान टाळणे शक्य होईल. तसेच पर्यावरणावरील विपरीत परिणामही कमी करणे शक्य होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

खनिज इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या कमी करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत आहेत. त्यामुळे गेल्या दशकामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी अनेक पिके घेतली जात आहेत. या पिकातून मिळणाऱ्या जैवभारासोबत अखाद्य तेलांचा वापर उष्णता, विद्युत आणि इंधन निर्मितीसाठी केला जातो.

मात्र प्रत्येक पडिक जागेवर किंवा स्थानिक जातींच्या वनस्पती नष्ट करून त्या जागी या पिकांची लागवड वेगाने वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जैवविविधतेला बाधा पोहोचत आहे. हे टाळण्यासाठी इंग्लंडमधील सरे विद्यापीठातील पर्यावरण आणि शाश्‍वतता केंद्रातील शास्त्रज्ञ सोफी टूज यांनी ऊर्जा पिकांच्या लागवडीसाठी होत असलेल्या जमिनीच्या वापराचे विश्‍लेषण केले आहे.

जंगले व अन्य वनस्पती नष्ट करून ऊर्जा पिकांची लागवड करण्यापेक्षा चीन आणि मध्य युरोपातील कृषी पिकाखालील जमिनीमध्ये त्यांची लागवड केल्यास जैवविविधतेची हानी कमी होऊ शकेल, असा दावा केला आहे.

Energy Crops Farming
Crop Damage Survey : ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करावेत’

सध्या पडीक आणि अन्य वनस्पतीखालील क्षेत्रावर ऊर्जा पिकांची लागवड केली जात आहे. ते प्रमाण भविष्यात वाढतच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. हा धोका कमी करण्यासाठी आपल्याला वास्तवावर आधारित व्यावहारिक निर्णय घ्यावे लागणार आहेत. सध्या तुलनेने नापीक किंवा खराब जमिनीवर अशा ऊर्जा पिकांच्या लागवडीची शिफारस केली जाते.

Energy Crops Farming
Agriculture Success Story : एकेकाळी केली मजुरी, आज शेतीत भरारी

त्यामुळे त्यातून मिळणारा जैवभार किंवा उत्पादन हे कमी राहते. अशा नव्या जमिनीवर या ऊर्जा पिकांच्या लागवडी करण्यापेक्षा सध्या शेतीखाली सुपीक जमिनीमध्ये लागवड केल्यास कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन मिळू शकेल. तसेच मुळात शेतीसाठी मानवाने आधीच बऱ्यापैकी जैवविविधतेचा ऱ्हास केलेला आहे. त्यात अन्य जमिनी ऊर्जा पिकाखाली आणत राहिल्यास एकूणच पर्यावरणावर व तेथील वनस्पती, कीटक आणि अन्य सजीवांच्या जैवविविधतेसाठी आणखी धोका होणार असल्याचे निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. या शास्त्रज्ञांच्या गटामध्ये सोफी टूज, रिचर्ड मर्फी, झो एम. हॅरीस, अॅड्रियाना डी पाल्मा यांचा समावेश होता.

स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेसाठी...

या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी जमीन वापराचे नकाशे आणि ऊर्जा पिकांखालील लागवडीची माहिती यांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. मध्य युरोप, संयुक्त अमेरिकन राष्ट्रांचा पूर्वेकडील किनारी भाग आणि चीन अशा काही ठिकाणी जैवविविधतेला पोहोचत असलेली हानी कमी करण्यासाठी अधिक काम करावे लागणार आहे.

जमिनीचा वापर करताना विशेषतः अन्नधान्य सुरक्षा, शेतकऱ्यांना योग्य ते प्रोत्साहन भत्ता यासह विविध पायाभूत सुविधांची उभारणी या दिशेने काम करावे लागेल. यातून संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वततेसंदर्भातील परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील ७ ध्येये, पर्यावरणविषयक १३ ध्येये आणि जमिनीच्या सुपीकता विषयक १५ ध्येये अशा विविध ध्येयधोरणांचाही पुरस्कार केला जाणार आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ ॲप्लाइड इकॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com