Tur Procurement 2025 : तुरीचे ६ कोटी ४८ लाख रुपयांवर चुकारे अदा

Tur Market : किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रति क्विंटल ७५५० रुपये) परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील पणन महासंघ अंतर्गत १६ केंद्रांवर शुक्रवार (ता. २३) पर्यंत १ हजार ६५२ शेतकऱ्यांची २८ हजार ८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
Tur Procurement
Tur ProcurementAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रति क्विंटल ७५५० रुपये) परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील पणन महासंघ अंतर्गत १६ केंद्रांवर शुक्रवार (ता. २३) पर्यंत १ हजार ६५२ शेतकऱ्यांची २८ हजार ८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

आजवर या दोन जिल्ह्यांतील ६३१ शेतकऱ्यांना ८ हजार ५८९ तुरीचे ६ कोटी ४८ लाख ५७० हजार ७२५ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. दरम्यान, या दोन जिल्ह्यांतील ३३ केंद्रावर ३ हजार ४४२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, तूर खरेदीसाठी मंगळवार (ता.२८) पर्यंत मुदत वाढ देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

केंद्रीय नोडल एजन्सी नाफेडच्या (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) वतीने हमीभावाने तूर खरेदी करिता राज्य सहकरी पणन महासंघ अंतर्गत परभणी जिल्ह्यात परभणी, पेडगाव, झरी, वरपुड, जिंतूर, बोरी, भोगाव, सेलू, मानवत, रूढीपाटी, पाथरी, देवनांदरा, सोनपेठ, पालम, चाटोरी, पूर्णा, एरंडेश्‍वर, ताडकळस या १८ केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या १ हजार ९८८ पैकी १ हजार ९७१ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले.

Tur Procurement
Tur, Chana Rate: तूर, हरभऱ्याची सरकारच्या धोरणामुळेच माती होणार का? 

शुक्रवार (ता. २३)पर्यंत पेडगाव, बोरी, भोगाव, सेलू, रूढी पाटी, देवनांद्रा, एरंडेश्‍वर,ताडकळस या ८ केंद्रांवर ८२४ शेतकऱ्यांची १३ हजार ५५३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत ९ कोटी ६२ लाख २८ हजार ५२५ रुपये होते.

केंद्रीय नोडल एजन्सी एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) वतीने तूर खरेदी करिता राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द, फाळेगाव, नागासिनगी, आडगाव, उमरा, पुसेगाव या १५ केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या सर्व २ हजार ७९४ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले.

Tur Procurement
Tur Rate: अकोल्यात तुरीचा दर सरासरी ७३७० प्रति क्विंटल

शुक्रवार (ता. २३)पर्यंत हिंगोली, कनेरगाव, फाळेगाव, कळमनुरी, सेनगाव, नागसिनगी, जवळा बाजार, आडगाव या ८ केंद्रांवर ८२८ शेतकऱ्यांची १४ हजार ५३० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत १० कोटी ९७ लाख रुपये होते.

६ कोटी ४८ लाखांवर चुकारे अदा...

परभणी जिल्ह्यात एकूण ८ हजार ४४९ क्विंटल तूर वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आली आहे. तूर विक्री केलेल्यांपैकी ५५४ शेतकऱ्यांना ७ क्विंटल २६७ तुरीचे ५ कोटी ४८ लाख ६९ हजार ६२५ रुपये एवढ्या चुकारे अदा करण्यात आले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात एकूण ६ हजार ४४१ क्विंटल तूर वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आली आहे. तूर विक्री केलेल्या पैकी ७७ शेतकऱ्यांना १ हजार ३२२ क्विंटल तुरीचे ९९ लाख ८१ हजार १०० रुपये चुकारे अदा करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com