
Akola News: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक होत असून सरासरी दर ७३७० पर्यंत सध्या मिळतो आहे. तुरीचा किमान दर ६४५० पासून मिळत असून कमाल ७६४० पर्यंत तूर विकली जात आहे.
सध्या नवीन तुरीची आवक जोरात सुरू झालेली आहे. यंदा तुरीचे सिंचन क्षेत्रात बऱ्यापैकी पीक आलेले आहे. तयार झालेला माल विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल असून सर्वच बाजार समित्यांत सध्या तुरीची आवक वाढलेली आहे.
अकोला ही पश्चिम विदर्भातील मध्यवर्ती व प्रमुख बाजारपेठ आहे. या ठिकाणी नवीन तुरीची आवक सध्या दोन हजार पोत्यांपेक्षा अधिक होत आहे. शनिवारी (ता. ८) २४०० क्विंटलची आवक झाली होती. ही आवक आणखी काही दिवस टिकून राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोयाबीनची आवकही टिकून
बाजार समितीत सोयाबीनची दररोज मोठी आवक सुरू आहे. शनिवारी २९४२ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीन सध्या सरासरी ४०४५ रुपयांनी विकली जात आहे. सोयाबीनचा किमान दर ३४०० व कमाल ४१२० रुपये एवढा आहे.
सोयाबीनची हमीभाव खरेदी अडगळीत पडलेली असल्याने शेतकऱ्यांना आता बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्रीशिवाय पर्याय राहिलेला नाही. यंदा सोयाबीनचा दर पाच हजारांवर मिळेल अशा अपेक्षेने बहुसंख्य शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले होते. परंतु बाजारात दर चढला नसल्याने शेतकऱ्यांना आता माल विक्रीशिवाय पर्याय राहिलेला नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.