Tur Production : एकात्मिक व्यवस्थापनातून तूर उत्पादनात वाढ करावी

Agriculture Integrated Management : एकात्मिक पीक व्यवस्थापनातून तूर उत्पादनात वाढ करावी, असा सल्ला खामगाव कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) डॉ. हनुमान गरुड यांनी दिला.
Integrated Management
Integrated ManagementAgrowon
Published on
Updated on

Beed News : एकात्मिक पीक व्यवस्थापनातून तूर उत्पादनात वाढ करावी, असा सल्ला खामगाव कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) डॉ. हनुमान गरुड यांनी दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव, (ता. गेवराई) यांच्या तर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत रोहितळ (ता. गेवराई) येथे मंगळवारी (ता. १९) तूर शेतीदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गरुड बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र खामगावच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर, प्रमुख पाहुणे सरपंच मुकुंद बाबर, उपसरपंच अनिल माळी, मंडळ कृषी अधिकारी आश्विनी म्हस्के, विषय विशेषज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे उपस्थित होते.

Integrated Management
Tur Production : तूर उत्पादक यंदा तरी तेजीचा फायदा घेणार का ? काय आहे तूर पुरवठ्याचे गणित?

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत खरीप हंगाम २०२३-२४ ला घेतलेल्या कडधान्य पीक प्रात्येक्षिकांतर्गत तूर पिकाच्या बिडीएन ७११ या वाणाचे समूह आद्यरेशीय प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकांसाठी रोहितळ व काजळवाडी येथील १० हेक्टर क्षेत्रावर २५ प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यापैकी तूर शेती दिन हा कार्यक्रम प्रयोगशील शेतकरी रमेश गायकवाड यांच्या शेतात घेण्यात आला. डॉ. गरुड म्हणाले, ‘‘बीडीएन ७११ या सुधारित वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे १५५ ते १६० दिवसांत परिपक्व होणारा, मध्यम जमिनीत चांगला प्रतिसाद देणारा, कमी पाण्यात चांगली उत्पादकता, मर रोगास प्रतिकारक्षम, शेवटच्या अवर्षणास प्रतिकारक्षम आहे.

Integrated Management
Tur Crop Damage : खरिपातील तुरीच्या पिकाचे उमरा मंडलात मोठे नुकसान

सुधारित वाणांचा वापर, विद्यापीठ निर्मित रायझोफोस या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया, एकात्मिक तणव्यवस्थापन, शिफारशीत खतांचा वापर, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शेंडा खुडणी, दोन ओळींनंतर चर काढणे आदी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.’’

डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी तूर, कापूस, हरभरा, ज्वारी पिकात करावयाच्या उपाययोजना तसेच एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. श्रीमती म्हस्के यांनी आभार व्यक्त केले. कृषी सहायक करण सुतार, विलास गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com