Ravikant Tupkar: पीकविमा आणि भरपाईबाबत तुपकरांची मुख्यमंत्री, कृषी सचिवांशी थेट चर्चा

Crop Insurance and Compensation Issue: पीकविमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी (ता. २८) मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Ravikant Tupkar and CM Devendra Fadanvis
Ravikant Tupkar and CM Devendra FadanvisAgrowon
Published on
Updated on

Buldana News: पीकविमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी (ता. २८) मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

पीकविम्याबरोबरच मागील वर्षीची राहिलेली नुकसान भरपाई तसेच ठिबक सिंचन अनुदान व शेतकऱ्यांच्या इतर समस्या आणि प्रश्नांबाबत चर्चा करीत हे प्रश्न सोडविण्याची विनंती केली. प्रधान कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची देखील भेट घेऊन पीकविमा, भरपाईप्रश्‍नी लक्ष घालण्याची मागणी केली.

Ravikant Tupkar and CM Devendra Fadanvis
Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकऱ्यांची पीकविम्याची रक्कम तसेच गतवर्षीची नुकसान भरपाईची रक्कम कंपनीकडे रखडली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी यासाठी तुपकर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी पीकविमा, गतवर्षीची राहिलेली नुकसान भरपाई तसेच ठिबक सिंचन अनुदान यासह सोयाबीनचा भाव फरकातील अनुदान, सोयाबीनचे दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या इतर समस्या मांडल्या.

तुपकर म्हणाले, की बुलडाणा जिल्ह्यात एआयसी पीकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील कापणी पश्‍चात पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या १ लाख २६ हजार २६९ शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा परतावा दिला नाही.

Ravikant Tupkar and CM Devendra Fadanvis
Crop Insurace: राज्यातील २३१ मंडळांमध्ये पावसातील खंड २१ दिवसांपेक्षा जास्त; पीक विम्याच्या अग्रीम भरपाईला पात्र ठरणार का?

त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीची कारणे देऊन अपात्र केलेल्या ७० हजार ८३१ शेतकऱ्यांना पीकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. ‘त्या’ शेतकऱ्यांनाही अद्याप परतावा दिला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३३ कोटी ८३ लाख रुपये रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे.

त्यामुळे या शेतकऱ्यांची तसेच राज्यात पीकविम्याची रक्कम बाकी आहे त्या शेतकऱ्यांना तातडीने ती रक्कम मिळावी, यासाठी संबंधित कंपनीला आदेशित करावे, अशी मागणी तुपकर यांनी केली. श्री. रस्तोगी यांचीदेखील भेट घेतली. मुख्यमंत्री आणि कृषीचे प्रधान सचिव यांनी पीकविमा आणि नुकसान भरपाईबाबत आश्वासक शब्द दिल्याचे तुपकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com