Revenue Department : तुळजापूर शहर भूमीअभिलेख कार्यालय बनले समस्यांचे आगार

Land Records Office Update : शहरातील जागा मालकांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या कामासाठी भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांची मोठी वर्दळ असते.
Revenue Department
Revenue DepartmentAgrowon
Published on
Updated on

Tuljapur News : तुळजापूर येथील भूमिअभिलेख कार्यालय नागरिकांच्या समस्यांचे आगार बनलेले आहे. शहरातील जागा मालकांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या कामासाठी भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांची मोठी वर्दळ असते.

या कार्यालयात अनेक नागरिक त्यांच्या जागेची मोजणी, फेरफारची प्रकरणे दाखल करतात. अनेकांना कार्यालयात जाऊन तासनतास खेटे मारावे लागतात. नागरिकांना मालमत्तेच्या उतार्याच्या नकला मिळण्यास उशीर होतो. भूमिअभिलेख खात्याचे तत्कालीन अधीक्षक डोईफोडे यांनी आत्महत्या केली. त्यानंतर तुळजापुरात कायमस्वरूपी तालुका भूमिअभिलेख अधीक्षक मिळू शकलेला नाही.

Revenue Department
Sugar Production : साखर कारखान्यांना मार्चसाठी २३.५ लाख टनांचा कोटा

जागा खरेदी केल्यानंतर वेळेत होणारे फेरफार तातडीने होणे आवश्यक आहे. तसेच अनेकांना कौटुंबिक व्यवस्थेत जागांचे नामांतरण करून घ्यावयाचे असते. तथापि या कामकाजामध्ये अनेक तांत्रिकदोष दाखवून विलंब केला जातो. तुळजापूर शहरामध्ये अनेक जागा मालकांना कार्यालयात गेल्यानंतर मोठा वेळ घालवावा लागतो.

तुळजापूर तालुका भूमिअभिलेख कार्यालयात चार नेमणतदारांची पदे आहेत. त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. तेथील कर्मचाऱ्यांना लोकांच्या कामासाठी होणारा तगादा तसेच त्यांचे प्रशासकीय कामकाज करून वेळ निभावून न्यावी लागते. मनुष्यबळ कमी असल्याचा मोठा फटका अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बसत आहे.

या कार्यालयात वेगवेगळ्या माध्यमातून दबावतंत्र वापरल्यामुळे अनेक कम॔चारी, अधिकारी काम करण्यास धजावत नाहीत. दरम्यान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मोजणीची कामे तसेच सुरत चेन्नई या मार्गाचे सर्व्हेक्षण आणि सोलापूर - तुळजापूर- धाराशिव या रेल्वेमार्गाच्या सर्व्हेक्षणामध्ये भूमिअभिलेख कार्यालयातील कम॔चार्यांचा मोठा वेळ यापूर्वी गेलेला आहे. पर्यायाने सध्या असणारे कामकाज अत्यंत घाईगडबडीने करण्याची वेळ कम॔चाऱ्यांवर आली आहे.

Revenue Department
Maize Rate : मक्याची उपलब्धता कमी; दर सुधारण्याची शक्यता
पंधरा दिवसांत ९१ फेरफार प्रकरणे मंजूर केली आहेत. सर्व कामे गतीने मिटवण्यात येत आहेत. अनेक रस्त्याची मोजणीची कामेहि पूर्ण झालेली आहेत. सर्व नागरिकांची कामे गतीने करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
राजेंद्र मालाव, प्रभारी तालुका उपअधीक्षक, भूमिअभिलेख कार्यालय
तुळजापूरचे भुमिअभिलेख कार्यालय समस्यांचे माहेरघर आहे. शेतकरी, घरजागा मालक यांना तेथे कार्यालयात गेल्यानंतरच नेमक्या काय समस्या आहेत. हे जाणवते.
निरंजन इंगोले, नागरिक, तुळजापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com