Agriculture Studies : शेतकऱ्यांनी अभ्यासले सेंद्रिय, नैसर्गिक शेतीचे कामकाज

Agriculture Department : सेंद्रिय व नैसर्गिक शेतीपद्धती शेतकऱ्यांना आत्मसात होण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहे.
Agriculture Study
Agriculture StudyAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची चळवळ विस्तारू लागली आहे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीपद्धती शेतकऱ्यांना आत्मसात होण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात असून, राज्याबाहेर उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील ४५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

सेंद्रिय व नैसर्गिक शेती आदी विविध प्रकारची माहिती शेतकऱ्यांनी घेतली. आत्मा नाशिकचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, प्रकल्प उपसंचालक वंदना शिंदे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

Agriculture Study
Organic Farming : लवकरच सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा येणार अस्तित्वात?

इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील ४५ शेतकऱ्यांचा आत्मा योजनाअंतर्गत सेंद्रिय शेतीचा अभ्यास करण्याकरिता नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक अँड नॅचरल फार्मिंग (NCOF) गाजियाबाद (उत्तर प्रदेश) तसेच बुलंदशहर येथील भारत भूषण त्यागी फार्म्स येथे सात दिवसीय आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात सेंद्रिय व नैसर्गिक शेतीच्या अभ्यासासाठी दिल्ली येथे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध सेंद्रिय निविष्ठा जसे जीवामृत, दशपर्णी, बीजामृत, निम पावडर तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

पद्मश्री भारत भूषण त्यागी यांच्या सेंद्रिय शेतीस भेटी देण्यात आली. नैसर्गिक/सेंद्रिय शेती योजनेतील शेतकऱ्यांची निवड करून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन सिन्नर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश चौधरी, इगतपुरी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे यांनी केले.

Agriculture Study
Natural Farming Program : दोनद येथे कृषी हवामान, नैसर्गिक शेती जागरूकता कार्यक्रम

सेंद्रिय शेती करणारे सिन्नर तालुक्यातील शेतकरी सुनील भिसे, रघुनाथ आव्हाड, गंगाधर भालेराव, दत्तात्रय शिंदे, संजय शिंदे, संदीप सांगळे इगतपुरीचे शेतकरी दशरथ भवारी, बबन बांबळे, रामदास भवारी, राधेकृष्ण धादवड, संजय बांबळे आदी ४५ शेतकरी अभ्यास दौऱ्यात सहभागी होते.

शेतीत रासायनिक खते वापरताना आरोग्यावर वाईट परिणाम पाहवयास मिळतात. गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. माणसाला विषमुक्त अन्न मिळाले तर माणसाचे आरोग्य चांगले राहू शकते. त्यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची असल्याने आत्माच्या वतीने जिल्हाभरात शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. त्या गटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी शेतकऱ्यांच्या ‘आत्मा’अंतर्गत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येते.
राजेंद्र निकम, प्रकल्प संचालक, आत्मा, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com