Government Scheme : आदिवासींनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

Narhari Zirwal : आदिवासी बांधवांनी अशा योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केले.
Narhari Zirwal
Narhari ZirwalAgrowon

Pusad News : आदिवासींसाठी पारंपरिक योजनात बदल करून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसारख्या नव्या योजना आणल्या आहेत. या योजनांतून चांगला व्यवसाय करता येईल. शंभर टक्के अनुदानावरील उपसा जलयोजनांचे नियोजन करा,

शबरी महामंडळाच्या योजना भौगोलिक परिस्थितीनुसार अंमलात आणल्या पाहिजे, ठक्कर बापू योजनेची मर्यादा एक कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ‘पेसा’ नियमावलीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. आदिवासी बांधवांनी अशा योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केले.

Narhari Zirwal
Pandhrapur News : पंढरपुरात १५ मार्चपासून फक्त ५ तासाच विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार | राज्यात काय घडलं?

तालुक्यातील आडगाव येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी (ता.१०) श्री. झिरवळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार इंद्रनील नाईक होते. या वेळी मंचावर माजी आमदार संतोष टारफे, मोहिनी नाईक, आशा पांडे, जितेंद्र मोघे, माधव वैद्य, बी. जी. राठोड, रामकृष्ण चौधरी,

Narhari Zirwal
Natural Water Source : काटेपूर्णात यंदा मार्च महिन्यातही नैसर्गिक जलस्रोत टिकून

लक्ष्मण टारफे, सदबाराव मोहटे, विजय मोघे, जयवंत वानोळे, सुरेश धनवे, भोलेनाथ कांबळे, बाबूसिंग आडे, साहेबराव धबाले, गजानन उघडे, अमोल फुके, विराज घुईखेडकर, तहसीलदार महादेव जोरवर, गटविकास अधिकारी संजय राठोड उपस्थित होते. श्री. झिरवळ पुढे म्हणाले, की छोट्या संवर्गाच्या आरक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले, की एसीनंतर एसटी आठव्या क्रमांकावर ठेवण्यात आल्याचे लक्षात आले, तेव्हा यात सुधारणा करण्यात आली.

आता एसटी क्रमांक दोनवर असले तरी यापुढे डोळसपणे लक्ष ठेवावे लागणार आहे. आरक्षण गरीब, मागासलेल्या समाजाला मिळाले पाहिजे. परंतु, ते दुसऱ्याच्या कोट्यातून नव्हे. आरक्षण मागताना संविधानिक पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com