Natural Water Source : काटेपूर्णात यंदा मार्च महिन्यातही नैसर्गिक जलस्रोत टिकून

Water for Wildlife : अकोला व वाशीम जिल्ह्यात विस्तारलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात यंदा मार्च महिन्यातही नैसर्गिक जलस्रोत टिकून आहेत. या पाण्यामुळे वन्यजिवांची मोठी सोय झालेली आहे.
Water Source
Water SourceAgrowon

Washim News : अकोला व वाशीम जिल्ह्यात विस्तारलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात यंदा मार्च महिन्यातही नैसर्गिक जलस्रोत टिकून आहेत. या पाण्यामुळे वन्यजिवांची मोठी सोय झालेली आहे.

काटेपूर्णा अभयारण्यात बिबट, अस्वल, हरीण, तडस, ससे, रानडुक्कर, नीलगायी आदी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या प्राण्यांसाठी उन्हाळ्याची चाहूल लागली आणि नैसर्गिक जलस्रोत आटले की वनविभागाकडून कृत्रिम पाणवटे तयार करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडले जाते.

Water Source
Collector Review : जलसंधारण कामे आणि निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

मात्र, यंदा काटेपूर्णाच्या क्षेत्रात मार्च महिन्यात सुद्धा नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. यामुळे अभयारण्यातील वन्य प्राण्यांना काटेपूर्णा अभयारण्यातच नैसर्गिक जलस्रोत असलेल्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे.

Water Source
Water Shortage : कोरड्या प्रकल्पांची संख्या पोहोचली ९५ वर

अभयारण्यातील नैसर्गिक जलस्रोत समोर जसे कोरडे पडतील, तेंव्हा वनविभागाकडून अभयारण्यामध्ये निर्माण करण्यात आलेल्या ४० कृत्रिम पाणवटयांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

काटेपूर्णा अभयारण्याची ओळख पाणी देणार जंगल असून, सद्यःस्थितीत अभयारण्यात नैसर्गिक जलस्रोतांमुळे जंगलातील वन्यप्राण्यांना पिण्याकरिता मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तसेच अभयारण्यात ४० कृत्रिम पाणवठे असून आवश्यक त्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्याचे काम वन विभागाकडून सुरू करण्यात आलेले आहे.
पवन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, काटेपूर्णा सोहळ अभयारण्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com