Pandhrapur News : पंढरपुरात १५ मार्चपासून फक्त ५ तासाच विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार | राज्यात काय घडलं?

१५ मार्चपासून पंढरपुर येथील विठ्ठल मंदिरात फक्त ५ तासचं मुखदर्शन घेता येणार नाही. त्यानंतर मुखदर्शन बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलीय.
Pandhrapur News
Pandhrapur NewsAgrowon

फक्त पाच तास मुखदर्शन

१५ मार्चपासून पंढरपुर येथील विठ्ठल मंदिरात फक्त ५ तासचं मुखदर्शन घेता येणार नाही. त्यानंतर मुखदर्शन बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलीय. ते पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.१२) बोलत होते. विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी दीड महीने कालावधी लागेल. तो पहाटे ५ ते ११ च्या दरम्यानचं श्री क्षेत्र पंढरपुर येथील विठ्ठलांचं मुखदर्शन घेता येणार आहे. त्यामुळे पुढील ४५ दिवस भाविकांना विठुरायाचं पदस्पर्श करून दर्शन घेता येणार नाही. चैत्री यात्रेसाठी भाविक पंढरपुरात येत असतात. त्यावेळी मात्र पूर्ण वेळ मुखदर्शन घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. १५ मार्चपासून मंदिरातील काम करण्यात येणार आहे. 

शक्तिपीठ महामार्गाला विरोध का?

नागपूर ते गोवा प्रस्तावित महामार्गाच्या विरोधात कोल्हापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.११) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येणाऱ्या या महामार्गात शेतकऱ्यांच्या शेकडो एकर सुपीक जमिनी जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये माजी आमदार संजयबाबा घाटगे उपस्थित होते. ते म्हणाले, "आमचा विकासाला विरोध नाही पण लोकांना उद्ध्वस्त करायचं त्यांच्या जमिनी काढून घ्यायच्या, असा सरकारचा डाव आहे." असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ देणार नाहीत, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. सरकारने राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण करावं. आम्ही मात्र जमिन देणार नाहीत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. नागपूर ते गोवा असा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग ७६० किलोमीटर लांबीचा आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या महामार्गाची घोषणा करण्यात आली होती. 

Pandhrapur News
Cotton Market Rate :  कापूस उत्पादन वाढल्याचे अंदाज; जागतिक उत्पादनाचाही अंदाज युएसडीएने वाढवला

कोरोमंडल इंटरनॅशनलची २०० ड्रोन

केंद्र सरकारने 'नमो ड्रोन दीदी' योजना राबवण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारच्या याच योजनेंतर्गत कोरोमंडल इंटरनॅशनल या संस्थेनं कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील महिला बचत गटांना २०० ड्रोनचं वाटप केलं. कोरोमंडल इंटरनॅशनल ही संस्था मुरुगप्पा ग्रुपची असून शेती निविष्ठांच्या निर्मितीसह अन्य क्षेत्रात कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२३ मध्ये नमो ड्रोन दिदी योजनेची घोषणा केली.

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील १५ हजार महिलांना ड्रोनसाठी अनुदानसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असा केंद्र सरकारचा दावा आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल अलीकडेच रंगारेड्डी जिल्ह्यातील माणिक्यम्मागुडा आणि आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिला बचत गटांना २०० ड्रोन वितरित करण्यात आले. "आम्ही माहिलांना शेती कामांसाठी ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिलं आहे." असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. कोरोमंडल इंटरनॅशनलनं एक दिवसात ३० एकर क्षेत्र फवारणी करणारे ड्रोन तयार केल्याचा दावाही केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com