Ranmeva : रानमेवा विक्रीतून संसाराला हातभार

Tribal Women : मुरबाड तालुक्यातील आदिवासी समाज रोजगाराअभावी हालाखीची परिस्थिती जगत आहे. त्यामुळे रोजच्या गरजा भागवण्यासाठी माळशेज घाट रस्त्यावर रानमेवा विक्रीतून उदरनिर्वाहासाठीची महिलांची धावपळ सुरू आहे.
Tribal Women
Tribal WomenAgrowon
Published on
Updated on

Palghar News : मुरबाड तालुक्यातील आदिवासी समाज रोजगाराअभावी हालाखीची परिस्थिती जगत आहे. त्यामुळे रोजच्या गरजा भागवण्यासाठी माळशेज घाट रस्त्यावर रानमेवा विक्रीतून उदरनिर्वाहासाठीची महिलांची धावपळ सुरू आहे.

आदिवासींना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागत असते. त्यांना उदरनिर्वाह भागवण्यासाठी निसर्गातील रानमेव्यावर अवलंबून राहावे लागते. महिला सकाळी लवकर उठून रानात जाऊन काजू, करंदे, आंबे, तोरण यासारखा रानमेवा दुपारी उन्हात मुरबाड-माळशेज घाट रस्त्याच्या कडेला लहान टोपली किंवा पळसाच्या पानाचा डोमा करून रानमेवा विकावा लागत आहे.

Tribal Women
Thane Tribal Protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांची धडक

वयाच्या साठीनंतर नातवंडांसमवेत आनंदाने वेळ घालवायची इच्छा असते. परंतु, पोटासाठी दिवसभर रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेऊन रानमेवा विकण्यासाठीची धडपड सुरू असते. एखादी गाडी थांबली नाहीतर दुसरी तरी गाडी थांबेल, या आशेने दिवसभर उन्हातान्हात बसतात.

Tribal Women
Nashik Tribal Women : नाशिकच्या आदिवासी माता मृत्यूचा दरात घट, आरोग्य विभागाचे मोठं यश

कायमस्वरूपी रोजगाराची गरज

भोरांडे, डोंगरवाडी, आवळेवाडी, मोरोशी, निरगुडपाडा, शिसेवाडी या आदिवासी वस्तीतील वृद्धांबरोबर तरुण, लहान मुले हा रानमेवा विक्री करतात. लहान करंदे, तोरणे पानाचा डोमा करून विकतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून गरजा भागवल्या जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com