Aaple Sarkar Service : विविध दाखल्यांच्या दरात दुप्पट वाढ

Tribal Student Issue : आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्राचे चलन शुल्क दुपटीने वाढविण्यात आले आहे.
Aaple Sarkar Service Center
Aaple Sarkar Service Center Agrowon
Published on
Updated on

Palghar News : दुर्गम भागातील नागरिकांचे राज्य, केंद्र सरकार आणि सामाजिक संस्थांच्या निरनिराळ्या योजनांमुळे जीवनमान उंचावू लागले आहे. कोणत्याही योजनेकरिता सरकारी दाखले अनिवार्य आहेत, मात्र सरकारी दाखल्यांचे दर दुप्पट झाल्याने येथील आदिवासी नागरिक हवालदिल झाले आहेत.

आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्राचे चलन शुल्क दुपटीने वाढविण्यात आले आहे. त्यामुळे रहिवासी, उत्पन्न यासह सर्व प्रकारची प्रमाणपत्रे, प्रतिज्ञापत्रे यांचे दर वाढले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर ही वाढ झाल्याने तालुक्यातील आदिवासी भागात मोठा फटका बसणार आहे. ही दरवाढ साडेसहा वर्षांनंतर झाली आहे.

Aaple Sarkar Service Center
Shabari Tribal Loan Scheme: शबरी आदिवासी विकास महामंडळातर्फे ‘व्यवसायासाठी कर्ज’

जव्हार तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना झाली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र, उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमिलेअर, रहिवासी आदी प्रकारचे दाखले वितरित केले जातात. काही दिवसांपूर्वी दहावी व बारावीचा निकाल लागला. त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांची गरज असते, शिवाय विविध प्रकारची प्रतिज्ञापत्र भरून द्यावी लागतात.

Aaple Sarkar Service Center
Tribal Products: आदिवासी बांधवांची प्रीमियम उत्पादने देशविदेशात मिळणार एका क्लिकवर

या काळात आपले सरकार केंद्र, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामध्ये पालकांची, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र आता ऐन प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावर आपले सरकार सेवा केंद्रातील प्रमाणपत्रांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. दहावीच्या निकालानंतर पालकांना विविध दाखल्यांची गरज भासते.

नवीन शुल्क आकारणी सुरू

२००८ मध्ये एका प्रमाणपत्रासाठी २० रुपये लागत होते. वाढती महागाई, जागेचे भाडे, विजेचे देयक, संगणक व प्रिंटरची देखभाल-दुरुस्ती यामुळे दरात २०१८ मध्ये वाढ केली होती. आता सरकारने पुन्हा हे दर दुपटीने वाढविले आहेत. त्यामुळे सामान्यांना मोठा फटका बसला आहे. शहर आणि जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये वाढीव दराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात २५ एप्रिलपासूनच नव्या दराने शुल्क आकारणी सुरू झाली आहे.

ग्रामीण भागात सुविधांची वानवा आहे. त्यामुळे सरकारने या भागात विशेष बाब म्हणून दाखल्यांची दरवाढ रद्द करत आदिवासींच्या उन्नतीला चालना द्यावी.
- कल्पेश राऊत, सरपंच, कासटवाडी
नांदगाव प्रांत तारापूर ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना मोफत दाखले दिले जातात, शिवाय शैक्षणिक, नोकरीविषयक लागणारे दस्तऐवज मोफत उपलब्ध करून देतो. त्यात सर्व प्रकारचे दाखले व विविध योजनेसाठी लागणारे प्रिंटआऊट, जन्म-मृत्यू नोंदणी दाखले दिले जातात. त्यामुळे सरकारी दाखल्यांची झालेल्या दरवाढ रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहे.
- समीर मोरे, सरपंच, नांदगाव प्रांत तारापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com