Shabari Tribal Loan Scheme: शबरी आदिवासी विकास महामंडळातर्फे ‘व्यवसायासाठी कर्ज’

Shabari Tribal Finance and Development Corporations : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळांतर्गत आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना व्यवसायासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या ७ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Business Loan
Business LoanAgrowon
Published on
Updated on

संदिप नवले

अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळांतर्गत आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना व्यवसायासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या ७ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयनिहाय घोडेगाव, राजूर, सोलापूर व छत्रपती संभाजीनगर या कार्यालयांना राज्य शासनाचा १६ व केंद्र शासनाचा ३९ लक्षांक प्राप्त झालेला आहे. या योजनेचा लाभ शबरी शाखा कार्यालय जुन्नर कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, बीड, लातूर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. योजनेंतर्गत स्वयंसहायता बचत गटांना ५ लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज, ऑटो

Business Loan
NABARD Dairy Loan : डेअरी व्यवसायासाठी नाबार्ड देतंय कर्ज; किती लाखांचं मिळणार कर्ज?

वर्कशॉप किंवा स्पेअरपार्ट व्यवसायासाठी ५ लाख रुपये, लहान उद्योग व्यवसायासाठी २ लाख रुपये, ऑटोरिक्षा किंवा मालवाहू रिक्षासाठी ३ लाख रुपये, वाहन व्यवसायासाठी १० लाखांपासून ते १५ लाख रुपयांपर्यंत व्यवसाय कर्ज अल्प व्याज दरात देण्यात येते. सदर कर्ज योजनेत कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही.

कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

या योजनेचे अर्ज https://mahashabari.in या संकेत स्थळावर भरावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी हे संकेतस्थळ तसेच महामंडळाचे जुन्नर शाखा कार्यालय, महसूल भवन, नवीन बस स्थानकाच्या बाजूला, जुन्नर येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. (०२१३२) २९५४७३ ई-मेल आयडी shabarijunnar@gmail.com वर संपर्क साधावा.

आदिवासी लाभार्थ्यांनी या कर्ज योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे शाखा व्यवस्थापक राहुल पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com