Agriculture Education : भाऊसाहेबांमुळे शिक्षण, कृषी क्षेत्रांत परिवर्तन

Sharad Pawar : शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी केले. त्यामुळेच विदर्भात मोठे सामाजिक परिवर्तन घडले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांन केले.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Amravati News : ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन परतल्यावर त्यांनी शेती क्षेत्रात लक्ष घातले. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान पोहोचावे याकरिता त्यांनी कृषी प्रदर्शनासारखा उपक्रम राबविला. इतक्‍यावरच न थांबता विदर्भातील बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी केले. त्यामुळेच विदर्भात मोठे सामाजिक परिवर्तन घडले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांन केले.

भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बुधवारी (ता. २७) बोलत होते. या प्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पहिल्या पुरस्काराने शरद पवार यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कोशाध्यक्ष दिलीप देशमुख, आमदार सुलभा खोडके, खासदार नवनीत राणा यांची उपस्थिती होती.

Sharad Pawar
Agriculture Education : नवे कृषी शिक्षण शेतकरी व्यवसायाला प्रतिष्ठा देणार

श्री. गडकरी म्हणाले, की शेती क्षेत्र हे ग्लोबली इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागणी आणि पुरवठा या धोरणानुसार पीक पद्धतीची निवड करावी. संत्र्यामध्ये संशोधन झाले नाही, परिणामी त्याची निर्यात होऊ शकली नाही. सह्याद्री फार्म कंपनीने द्राक्षाची जात स्पेनमधून आणली त्यामुळेच द्राक्ष निर्यातीला चालना मिळाली. आता त्यांनी संत्र्याचे वाण देखील स्पेनवरून आणले आहे. त्यातून संत्रा निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

आईच्या आठवणींना दिला उजाळा

शरद पवार यांनी त्यांच्या आईच्या माध्यमातून आम्ही भावंडे कसे घडलो या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. आई शारदा पवार या गावात राहत तर आम्ही शिक्षणासाठी पुण्यात राहत होतो. त्या वेळी आई एसटीवर जेवणाचा डबा पोहोचवीत होती. शिक्षणाची महती तिला कळाली. तिच्या संस्कारातूनच आम्ही भावंडे घडलो, असे ते म्हणाले.

Sharad Pawar
Agriculture Education In School : 'अ''आ'बरोबरच आता शाळेत कृषीचाही अभ्यास

त्यामुळेच भाऊसाहेबांच्या नावाने मिळालेल्या पाच लाखांच्या पुरस्कारात आणखी १५ लाखांची भर टाकत त्या व्याजावर दरवर्षी विदर्भातील शेतीक्षेत्रातील प्रयोगशील, संघर्षशील एका महिलेचा गौरव करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

‘इंडिया’ आघाडीत वाद नाही

एकत्र निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे आहे. त्यामुळेच आघाडीत सहभागी झालो आहोत. आम्ही एकत्रितपणे जागांबाबत निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी कार्यक्रमानंतर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. आघाडीत कोणताही वाद नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com