Aslam Abdul Shanedivan
आपल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. त्यामुळे शेतीचे वेगळे शिक्षण मुलांना द्याव लागत नाही. पण आता कृषीचे शिक्षण पहिलीपासून मिळणार आहे.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली.
शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्याच्या अनुशंगाने तर मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण होण्यासाठी पहिलीपासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
पर्यावरण संतुलन बिघडल्याचे परिणाम वातावरणावर होत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
पर्यावरण संतुलन बिघडत असल्यानेच पहिलीपासून कृषी अभ्यासक्रम सुरू केला तर जनजागृती होईल. म्हणून ही संकल्पना राबवली जात आहे.
कृषी अभ्यास सुरू करण्यात येणार असून याची सुरुवात चालू शैक्षणिक वर्षात करण्यात येणार आहे.
शेतीकडे वळा
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शेतीकडे वळा, असा संदेशही दिला जाणार आहे. कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यामध्ये करार झाला आहे.