Agriculture Technology : प्रयोगशील, संरक्षित शेतीचे गवसले तंत्र

Success Story of Farmer : बुलडाणा जिल्ह्यातील रामनगर येथील शिवगंगा व रामभाऊ या भगत या दांपत्याने काळाची पावले ओळखली. त्यानुसार पीक पद्धतीत बदल केला. हंगामी व फळपिकांसह शेडनेटमधील भाजीपाला बीजोत्पादन तंत्र स्वीकारले.
Shivganga And Rambhau Bhagat
Shivganga And Rambhau Bhagat Agrowon

गोपाल हागे

Agriculture Cropping Methods and Techniques : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक गावांत पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्याने हंगामी पिके घ्यावी लागतात. मात्र प्रतिकूल परिस्थितीत इथले शेतकरी नवे प्रयोग व सुधारित तंत्राचा वापर करीत शेतीत यश संपादन करीत आहेत. रामनगर येथील रामभाऊ भगत यांची १७ एकर शेती आहे. ते पेशाने शिक्षक आहेत. मात्र नोकरी सांभाळून पत्नी शिवगंगा यांच्या साह्याने त्यांनी शेतीचा डोलारा लीलया सांभाळला आहे.

पीक पद्धती व तंत्राचा स्वीकार

भगत पूर्वी कापूस हे पीक घ्यायचे. पुढे सोयाबीन, मका, शाळू आदी पिकांमध्ये लक्ष घातले. त्यातून उत्पन्न मिळवीत शेती घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी सिंचनाच्या सुविधा निर्माण केल्या, अलीकडील चार वर्षांत त्यांनी शेडनेटमधील (संरक्षित शेती) भाजीपाला बीजोत्पादन तंत्राचा स्वीकार केला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा, लोणार, सिंदखेडराजा, मेहकर आदी तालुक्यांत राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय बियाणे कंपन्यांचे बीजोत्पादन कार्यक्रम घेतले जातात. चिखली तालुक्यातील शेतकरीही त्यात उतरले आहेत. भगत यांनी सुरुवातीला दहा गुंठ्यांत शेडनेट उभारले. तत्पूर्वी बारामती (जि. पुणे) व बुलडाणा येथे प्रत्यक्ष व कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण घेतले.

आज अनुभव वाढल्यानंतर व यश दिसू लागल्यानंतर प्रत्येकी एक एकर असे दोन एकरांत त्यांचे शेडनेटमधील बीजोत्पादन सुरू आहे. कारली, टोमॅटो, मिरची यांचे ठरावीक टप्प्याने बीजोत्पादन केले जाते. यात मल्चिंग पेपरचा वापरही केला आहे. त्यातून रसशोषक किडींना अटकाव करण्यासह तणांना पायबंद बसतो. शेतातील आर्द्रता टिकवता येते.

Shivganga And Rambhau Bhagat
Heavy Rain Khandesh : खानदेशात पावसाचा हाहाकार

सिंचन सुविधा केल्या निर्माण

भगत यांची पूर्वी पाच एकर शेती होती. सन १९९९ ते २०१५ या काळात त्यांनी १७ एकरांपर्यंत हे क्षेत्र नेले. आज त्यात शेडनेट क्षेत्राव्यतिरिक्त खरिपात सोयाबीन, तूर व रब्बीत हरभरा असतो. दोन एकरांत सीताफळ बाग असून ती तीन वर्षांची झाली आहे. पुढील हंगामापासून त्याचे उत्पादन घेतले जाईल.

या भागात पाण्याची समस्या आहे. बारमाही सिंचनासाठी स्रोत कमी आहेत. सर्व पीक पध्दतीचा विचार करून २००२ मध्ये २४ बाय २४ बाय ५ मीटर व ३४ बाय ३४ बाय ५ मीटर अशा आकाराची दोन शेततळे खोदली. सोबतच दोन नवीन विहिरी घेतल्या. खडकपूर्णा प्रकल्पातून दोन किलोमीटर अंतरावरून विहिरींचे पाणी शेतात आणले.

त्यासाठी अडीच व तीन इंची पाइपलाइन केली. शेडनेट उभारलेल्या शेतात पाण्याची उपलब्धता कायम असण्यासाठी प्रत्येकी पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्या बसवून एकूण २० हजार लिटरचा पाणीसाठा तयार केला आहे. शेततळी, टाक्या वरच्या बाजूला व शेडनेट शेती खालील बाजूस असल्याने वीज नसली तरी सिंचनाच्या कामाला बाधा पोहोचत नाही. ठिबकच्या साह्याने पाण्याची गरज पूर्ण केली जाते.

थंडावा निर्माण करणारी सुविधा

भगत यांनी मोठ्या आकाराचे दोन चौकोनी हौद तयार करण्यास सुरुवात केली आहेत. यात एक भिंत व त्यापासून काही अंतरावर दुसरी भिंत बांधली आहे. मधल्या भागात विटा व रेतीचा थर असेल. त्याच्या वरच्या भागात पाण्याची टाकी व ठिबक बसविले आहे.

या माध्यमातून थंडावा तयार केला जाईल. यामुळे हौदामध्ये ठेवलेल्या शेतीमालाला ‘कोल्ड स्टोअरेज’सारखे वातावरण मिळेल. गरजेनुसार हा शेतीमाल टिकवून तो विक्रीला पाठवण्याची ही व्यवस्था केल्याचे भगत म्हणाले.

रामभाऊ भगत ८२७५२३३५०५

Shivganga And Rambhau Bhagat
Livestock Market : कार्तिकी यात्रेत तीन वर्षांनी भरला जनावरांचा बाजार

कृषी संजीवनी योजनेचे पाठबळ

संरक्षित शेती पद्धतीच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे पाठबळ मिळाले आहे. या योजनेतून कृषी विभागामार्फत शेडनेट तसेच पत्नी अध्यक्षा असलेल्या जिजाऊ महिला गटाला अवजारे बँक मिळाली. एका शेडनेटसाठी १६ लाख, दुसऱ्या शेडनेटला २१ लाख रुपये, तर अवजारे बँकेसाठी १२ लाखांचे अनुदान मिळाले.

जिल्ह्यातील शेतकरी बीजोत्पादन, अवजारे बँकेची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी येत असतात. बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगेसांगतात, की देऊळगावराजा तालुक्याने भाजीपाला बीजोत्पादनात मोठी झेप घेतली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून ते उत्पन्नात भर घालत आहेत.

शेतीतून वैभवाचे दिवस

भगत दांपत्याच्या अतुल व माधवी या दोन्ही मुलांनी ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केले आहे. मुलगी ‘एमडी’चा अभ्यासक्रम पूर्ण करते आहे. शेतीतील उत्पन्नाचा कुटुंबावा मोठा आर्थिक आधार झाला आहे. त्याच जोरावर चिखली शहरात तीन बीएचके घराचे तर देऊळगावराजा येथे दोन बीएचके घराचे बांधकाम झाले. सिंचनाच्या सुविधाही त्यातूनच झाल्या. संरक्षित शेतीतून वर्षाला काही लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com