Flax Thresher : कष्ट कमी करणारे जवस मळणी यंत्र

Agriculture Technology : जवस मळणीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दोन अश्‍वशक्ती इलेक्ट्रिक मोटरवर चालणारे जवस मळणी यंत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी शक्ती व अवजारे विभागाने विकसित केले आहे.
Flax Thresher
Flax ThresherAgrowon
Published on
Updated on

डॉ. अनिल कांबळे, डॉ. सुरेंद्र काळबांडे, डॉ. अविनाश गजकोस

जवस हे एक औद्योगिक, खाद्यतेल व तंतू देणारे पीक आहे. यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. जवसामध्ये सुमारे ४१ टक्के तेल, २० टक्के प्रथिने, २८ टक्के आहारतंतू, ७.७ टक्के आर्द्रता आणि ३.३ टक्के राख असते. याबरोबरीने ७५ टक्के पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्‍स, त्यांपैकी ५७ टक्के अल्फा-लिनोलेनिक अॅसिड आणि १६ टक्के लिनोलिक अॅसिड असते. हे काही प्रकारच्या शरीरावरील सूज कमी करणे साठी उपयुक्त आहे.

जवस तेल डोळ्यांची दृष्टी, रंग ओळखण्याची क्षमता सुधारते. मेंदू, डोळ्यांची रेटिना व केसांच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. याबरोबरीने केसांमधील कोंडा कमी करणे, झीज किंवा सूज बरी करण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये प्रोस्टेट व आतड्यांच्या कर्करोगास प्रतिबंध तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणाचे गुणधर्म आहेत. हे ओमेगा- ३ चे समृद्ध स्रोत असल्याने मानवी शरीरातील चयापचय नियमित ठेवण्यास मदत करते आणि मेंदूशी संबंधित विकारांपासून संरक्षण करते.

Flax Thresher
Agriculture Technology: तंत्रज्ञान विकासातून यंत्रामध्ये होणारे बदल

तेलाचा वापर विविध औद्योगिक कार्यासाठी होतो. हे तेल प्रामुख्याने रंग, वार्निश, प्रिंटिंग शाई, साबण आदी बनविण्यासाठी वापरले जाते. तेल काढून उरलेला पेंड दूध देणाऱ्या जनावरांसाठी उत्तम चारा आहे. या वनस्पतीच्या खोडातील तंतूंना अधिक मजबुती व टिकाऊपणा असल्याने त्यांचा उपयोग अनेक घरगुती वस्तू बनविण्यासाठी केला जातो.

पिकाचे तंतू हे सर्व नैसर्गिक तंतूंमध्ये सर्वांत पर्यावरणस्नेही आहेत. मजबुती, सूक्ष्मता आणि टिकाऊपणा ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. हे तंतू चमकदार, मजबूत, लवचीकतेने कमी, अधिक टिकाऊ व हवामानातील बदलांना अधिक प्रतिकार करणारे असतात.

हे तंतू लोकर, रेशीम, कापूस इत्यादींसोबत सहज मिसळता येतात. यांचे तंतू सोनेरी केसांसारखे दिसतात. यांचे धागे अतिशय मजबूत असून, त्यांचा वापर जोडे बनवण्यासाठी, मासेमारीच्या जाळ्या व दोर तयार करण्यासाठी केला जातो. कॅनव्हास, गालिचे, चादरी आणि

चटया बनविण्यासाठीही मोठ्या प्रमाणात होतो. फ्लॅक्स-जूट व फ्लॅक्स-कॉटन मिश्रित कापड शंभर टक्के जूट किंवा कापसाच्या कापडापेक्षा अधिक दर्जेदार असते.

Flax Thresher
Agriculture Technology: कृषी यंत्रांना स्मार्ट करणाऱ्या यंत्रणा

...असे आहे जवस मळणी यंत्र

जवस पिकाची मळणी करताना अनेक अडचणी येतात. पारंपरिक पद्धतीत शेंगा काठीने ठोकून किंवा जनावरांच्या पायाखाली तुडवून मळणी केली जाते. काही भागात खळ्यात पसरविलेले पिकावर ट्रॅक्टर चालवून मळणी केली जाते. मात्र या पद्धती वेळखाऊ, कष्टदायक आणि अपूर्ण मळणी करणाऱ्या आहेत. यामुळे बियांचे खूप नुकसान होते.

सद्यःस्थितीत, हाताने चालवली जाणारी मळणी यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत, पण ती मळणी कार्यक्षमतेने कमी, उत्पादन क्षमतेने कमी आणि सफाई क्षमता कमी असून, वेळ व मेहनत जास्त लागते. त्यामुळे ती मोठ्या क्षेत्रासाठी किंवा छोट्या, मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नाहीत. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणे तसेच मळणी कार्यक्षमता वाढवण्यासाठी दोन अश्‍व शक्ती इलेक्ट्रिक मोटरवर चालणारे जवस मळणी यंत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी शक्ती व अवजारे विभागाने विकसित केले आहे.

यंत्राची मळणी कार्यक्षमता ९९.४१ टक्के, मळणी क्षमतेचा दर २५ किलो/तास, सफाई कार्यक्षमता ९६.९७ टक्के, तुटलेल्या धान्याचे प्रमाण ०.३७ टक्के, पंखामधून हवेसोबत उडून गेलेल्या धान्याचे प्रमाण ०.५२ टक्के, मळणी न झालेले धान्याचे प्रमाण ०.५९ टक्के म्हणजेच एकूण धान्याचे नुकसान १.४८ टक्का आढळून आले.

यंत्रामुळे पारंपरिक मजुराद्वारे मळणी पद्धतीपेक्षा मळणी खर्चात ३७ टक्के बचत होते (प्रति क्विंटल उत्पादनाचा हिशेब). वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात झालेल्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीमध्ये जवस मळणी यंत्रास प्रसारित करण्याची मान्यता प्राप्त झाली आहे.

- डॉ. अनिल कांबळे, ९८८१०५६९४०

(कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com