Traditional Seed : पारंपरिक बियाण्यांना आठवडे बाजारात मागणी

Kharif Season : खरिपाच्या पेरणीकरिता बियाणे खरेदी करण्यासाठी दुकानांमधील पॅकबंद बियाण्यांपेक्षा शेतकऱ्यांकडील खात्रीलायक बियाणे खदेरीकरण्यासाठी ग्राहक पसंती देत आहेत.
Seed
Seed Agrowon

Pune News : खरिपाच्या पेरणीकरिता बियाणे खरेदी करण्यासाठी दुकानांमधील पॅकबंद बियाण्यांपेक्षा शेतकऱ्यांकडील खात्रीलायक बियाणे खदेरीकरण्यासाठी ग्राहक पसंती देत आहेत.

मंगळवारी (ता.११) आठवडे बाजारात तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी आपल्या शेतात देशी बियाण्यांचे उत्पादन केलेले बियाणे विक्रीसाठी आणले होते. या बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी पसंती दिली.

Seed
Seed Treatment : बीजप्रक्रियेतून सोयाबीनवरील कीड-रोगांना प्रतिबंध

विविध बियाण्यांमध्ये भुईमूग, गावरान वाटाणे, तीन प्रकारचे घेवडे, चवळी, हरभरे, पांढरे व काळे तीळ अशा प्रमुख पिकांच्या बियाणांचा समावेश आहे. शेतीसाठी सध्या खते व इतर साहित्याची खरेदी करावी लागते.

Seed
Cotton Seeds : बाजारात कपाशीचे ‘ते’ बियाणे मिळेना

त्यासाठी महिला शेतकरी घरातील कडधान्याचे बियाणे विकून पैसे उभे करतात. आणि त्या पैशामधून खते व शेतीच्या इतर साहित्याची खरेदी करतात. मंगळवारच्या बाजारात किलोला सर्वाधिक २०० रुपये दर हा भुईमूग आणि वाटाण्याच्या बियाण्यांना होता.

याशिवाय इतर सर्व प्रकारच्या बियाण्यांसाठी १०० ते १५० रुपये दर होता. खासगी कंपन्यांचे बियाणांची खात्रीही मिळत नाही. म्हणून ग्राहक बाजारातील शेतकऱ्यांच्या घरातील आपल्याच भागातील मातीमध्ये तयार खात्रीलायक बियाणे खरेदी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com