sandeep Shirguppe
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांना खरड छाटणीचे वेध लागले आहेत.
आतापर्यंत ४० टक्के खरड छाटण्या पार पडल्या आहेत. उर्वरित छाटण्या पाण्याअभावी रखडलेल्या आहेत.
यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
कवटेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यासह तालुक्यात द्राक्ष पिकाचे ३२८३.८६ हेक्टर क्षेत्र आहे.
घाटनांद्रे, तिसंगी, जाखापूर, गर्जेवाडी, कुंडलापूर, कुची या गावांत ४४५.१० हेक्टर द्राक्ष पिकाचे क्षेत्र आहे.
द्राक्ष हंगाम संपल्यानंतर खरड छाटणी घ्यावी लागते. त्यासाठी द्राक्ष पिकाला पाण्याची मोठी गरज असते.
सध्या घाटमाथ्यावर पाणीटंचाई भेडसावत आहे. एप्रिल, मे या दोन महिन्यांत खरड छाटण्या पूर्ण होतात.
तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेला द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
द्राक्ष हंगामातील आर्थिक जमाखर्च व ताळमेळातून शेतकरी सावरतो न सावरतो, तोच खरड छाटणीला समोर जावे लागत आहे.