Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Indian Council of Medical Research (ICMR) : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागने केलेल्या अभ्यासातून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ज्यात शेतकऱ्यांच्या लघवीच्या नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे अंश सापडले आहेत.
Pesticide residues found in farmer's urine
Pesticide residues found in farmer's urineAgrowon
Published on
Updated on

Pune News : तेलंगणा सरकार सध्या शेतकऱ्यांच्या आरोग्यावरून चांगेलच चिंतेत आले आहे. राज्यातील काही शेतकऱ्यांच्या लघवीच्या नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे अंश सापडले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (DST) केलेल्या संयुक्त अभ्यासातून ही बाब उघड झाली आहे. ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२३ या कालावधीत याबाबत अभ्यास केला होते.

आयसीएमआर आणि डीएसटीने राज्यातील यदाद्री-भुवनगिरी, विकाराबाद आणि संगारेड्डी या तीन जिल्ह्यांतील १५ गावांची निवड करण्यात आली होती. पण तेलंगणातील कृषी क्षेत्राचे व्यापक प्रतिनिधित्वासाठी ५ गावांची निवड करण्यात आली. तर या अभ्यासाठी ४९३ विविध संस्थांच्या संशोधकांचा सहभाग घेण्यात आला. यावेळी निवडण्यात आलेल्या गावातील शेतकऱ्यांचे दोन गट तयार करण्यात आले. एक कीटकनाशकांच्या संपर्कात आलेले आणि दुसरा गट तो कीटकनाशकांच्या संपर्कात आलेला नाही. शेतकरी आणि शेत मजूर यांचा घातक रसायनांच्या संपर्कात आल्याने कोणता परिणाम होतो? याचे मूल्यांकन करणे, असे या अभ्यासाचा मुख्य उद्देश होता.

Pesticide residues found in farmer's urine
Illegal Pesticides License Fees : परवाना नूतनीकरणावरील शुल्क वसुली बेकायदेशीर

तेलंगणातील कृषी क्षेत्राचे व्यापक प्रतिनिधित्व करणाऱ्या या ५ गावातील दोन्ही गटातील शेतकऱ्यांच्या सखोल मुलाखती घेण्यात आल्या. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्यात रक्त आणि लघवी (मूत्र) यांचे नमुने घेण्यात आले. या अभ्यासात कीटकनाशकांच्या दीर्घकालीन वापरामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. तसेच अहवालातून रसायनांच्या हानिकारक प्रभावापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लघवीत कीटकनाशकांचे अवशेष

या घेण्यात आलेल्या लघवीच्या नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे अंश सापडले. अभ्यासात ऑर्गनोफॉस्फेट्स, कार्बामेट्स, पायरेथ्रॉइड्स आणि निओनिकोटिनॉइड्ससह २८ सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचे अंश सापडले आहेत. तर यांचा शोध घेण्यासाठी लिक्विड क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रोमेट्री/मास स्पेक्ट्रोमेट्री (LC-MS/MS) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.

Pesticide residues found in farmer's urine
Pesticide : कीटकनाशके फवारताना काळजी घ्यावी

कीटकनाशकांचे प्रमाण जास्त

तर अभ्यासातून नमुन्यांमध्ये सापडलेले कीटकनाशकांचे अंश प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे उघड झाले आहे. हे प्रमाण शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारे आहे. ज्या शेतकऱ्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्यात श्वास लागणे, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ आणि स्नायू कमकुवत होणे यासारखी लक्षणे नोंदवण्यात आली आहेत. यापैकी अनेक लक्षणे भारतात वापरल्या जाणाऱ्या सर्वात धोकादायक कीटकनाशकांपैकी एक असणाऱ्या ऑर्गनोफॉस्फेट्सच्या दीर्घकालीन वापराशी संबंधित आहेत.

अभ्यासात सापडली २८ कीटकनाशके

अभ्यासात २८ सामान्य कीटकनाशके आढळून आली आहेत. ज्यात ऑर्गनोफॉस्फेट्स, कार्बामेट्स, पायरेथ्रॉइड्स आणि निओनिकोटिनॉइड्स सारख्या विविध कीटकनाशकांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com